Photo : मुंबईतही अवकाळी पाऊस; शिवाजी पार्क परिसरात पसरला मातीचा सुगंध

महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांप्रमाणे मुंबईतही अवकाळी पावसाने गुरुवारी रात्री हजेरी लावली. मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. मळभ आल्याने हवेत थोडासा गारवा होता. अचानक रात्री पाऊस पडल्याने चाकरमन्यांना भिजतच घरी जावे लागले. काही भागात लहान मुलांनी व नागरिकांना या अवकाळी पावसात भिजण्याचा मोह आवरता आला नाही. शिवाजी पार्क येथे पडलेल्या पावसाची काही दृश्ये. (छायाः राजेश वराडकर)

अवकाळी पावसामुळे शिवाजी पार्क येथील रस्ता ओला झाला होता. वाहतूक मंद गतीने सुरु होती. पादचाऱ्यांचेही हाल झाले.

अचानक पडलेल्या पावसामुळे रस्त्यावरील वर्दळ कमी झाली होती. वाहनांची संख्याही कमी झाल्याने रस्ते मोकळे झाले होते.

मुंबई व आसपासच्या परिसरात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार रात्री मुंबईत पावसाने हजेरी लावली. अचानक पडलेल्या पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली.