घरराजकारणमी माझी भूमिका जालन्यात जाऊन स्पष्ट करेन, अर्जुन खोतकरांचे स्पष्टीकरण

मी माझी भूमिका जालन्यात जाऊन स्पष्ट करेन, अर्जुन खोतकरांचे स्पष्टीकरण

Subscribe

आज शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची भेट घेतली. या भेटीत त्यांची रावसाहेब दानवे यांच्याशी दीड ते दोन तास चर्चा झाली. या भेटीनंतर खोतकर यांना शिंदे गटात प्रवेश करण्याबाबत विचारले असता त्यांनी मी माझी भूमिका जालन्यात जाऊन स्पष्ट करेन, असे उत्तर दिले.

अर्जुन खोतकर काय म्हणाले –

- Advertisement -

रावसाहेब दानवेंनी चहाचे निमंत्रण दिले होते. त्यामुळे मी त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन येथे आलो होतो. मी शिवसेनेतच आहे. या पूर्वी आम्ही 40 वर्ष एकत्र काम केले आहे, असे अर्जुन खोतकर म्हणाले. यावेळी त्यांना शिंदे गटात प्रवेश करण्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी मी माझी भूमिका जालन्यात जाऊन स्पष्ट करेन असे उत्तर दिले.

रावसाहेब दानवेंची प्रतिक्रीया –

- Advertisement -

मी खोतकरांना आज चहाचे निमंत्रण दिले होते, असे दानवे म्हणाले. यावेळी त्यांना शिंदे गटात अर्जुन खोतकर सामील होणार का असे विचारले असता त्यांनी शिंदे गट नाही ही खरी शिवसेना आहे. आमचे मनोमीलन झाले आहे. आम्ही एकमेकांना साखर खाऊ घातली आहे, असे उत्तर दिले.

संजय राऊत काय म्हणाले – 

दोन दिवसांपूर्वीच अर्जुन खोतकर यांच्याशी मी चर्चा केली होती. ते मला म्हणाले होते रावसाहेब दानवेंना गाडल्याशिवाय मी राहणार नाही. लोकसभा निवडणुकीत उभा राहीन आणि दानवेंना घरी बसवेल असं ते म्हणाले होते. खोतकर यांचे काही शब्द सांगू शकत नाही. शिवसेनेच्या व्यासपीठावरील खोतकर यांची तुम्ही भाषणं ऐकली तर मला वाटतं काही तरी गैरसमज झाला असावा. खोतकर शिवसेनेत आहेत. ते स्वत:हून सांगत नाहीत, तोपर्यंत ते सेनेत आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -