घरराजकारणलोकसभा 2024Lok Sabha 2024: उद्धव ठाकरेंनी गमावलं ते शिंदेंनी जपलं; बाळासाहेबांचा उल्लेख करत...

Lok Sabha 2024: उद्धव ठाकरेंनी गमावलं ते शिंदेंनी जपलं; बाळासाहेबांचा उल्लेख करत शहांचा हल्लाबोल

Subscribe

अमित शहा यांनी सभेत काँग्रेस नेते राहुल गांधींवरही जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, राहुल गांधी पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहत आहेत. ते कधीही पंतप्रधान होणार नाहीत. त्यांची स्वप्न ही शेखचिल्लीसारखी आहेत.

अमरावती: हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार उद्धव ठाकरे विसरले आहेत. बाळासाहेबांचा वारसा जर कोणी जपत आहे तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जपत आहेत, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत अमित शहांनी राहुल गांधीसह उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. बच्चू कडूंना परवानगी नाकारण्यात आलेल्या सायन्सकोर मैदानात ही सभा घेण्यात आली.(Lok Sabha Election 2024 Amit Shah Criticized Uddhav Thackeray in Amaravati rally of Navneet Rana)

काय म्हणाले अमित शहा? 

अमरावतीमध्ये उमेश कोल्हेंची हत्या झाली होती. त्यावेळी स्वत:ला हिंदू हितरक्षण म्हणवणारे उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं. परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार उद्धव ठाकरे विसरले आहेत. बाळासाहेबांचा वारसा जर कोणी जपत आहे तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जपत आहेत. राज्यात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे. त्यामुळे आता कोणत्याही उमेशची हत्या होणार नाही, असं आश्वासनही त्यांनी दिलं. तसंच, नवनीत राणांना विजयी करण्याचं आवाहनही त्यांनी अमरावतीकरांना केलं. यावेळी त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधींना टोला लगावला. नवनीत राणांच्या नावासमोरील बटण इतक्या जोरात दाबा की करंट थेट इटलीत गेला पाहिजे, असं शहा म्हणाले.

- Advertisement -

राहुल गांधी शेखचिल्लीची स्वप्न

अमित शहा यांनी सभेत काँग्रेस नेते राहुल गांधींवरही जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, राहुल गांधी पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहत आहेत. ते कधीही पंतप्रधान होणार नाहीत. त्यांची स्वप्न ही शेखचिल्लीसारखी आहेत. काँग्रेस सत्तेत आलं तर ट्रिपल तलाक कायदा परत आणणार असं म्हटलं आहे. परंतु काँग्रेस सत्तेत येणार नाही, त्यांना येऊ देणार नाही. त्यामुळे ट्रिपल तलाक कायदा रद्द होणार नसल्याचंही शहांनी स्पष्ट केलं.

आरक्षण रद्द होणार नाही….

बीजेपी पुन्हा एकदा सत्तेत आलं तर ते आरक्षण रद्द करणार अशी अफवा काँग्रेसकडून पसरवली जात आहे. काँग्रेस हे मुद्दाम करत आहे. आम्ही कधीही आरक्षण रद्द करणार नाही, ही मोदींची गॅरंटी असल्याचं, अमित शहांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

सभेपूर्वीच पावसाचं आगमन

अमित शहा यांच्या सभेपूर्वी अकोला शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसातही सभास्थळी नागरिक उपस्थित होते. बसण्यासाठी असलेल्या खुर्च्या भर पावसात डोक्यावर घेऊन नागरिक शहा यांची प्रतीक्षा करत सभा मंडपात उभे होते. या पावसातही नागरिकांचा उत्साह मात्र कायम होता.

(हेही वाचा: Lok Sabha Election 2024 : भोवळ आल्यानंतरही नितीन गडकरींचे जोरदार भाषण)


Edited By- Prajakta Parab 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -