घरराजकारणदहशतवादी सरकार बारसूमध्ये हत्याकांड घडवण्याच्या तयारीत; राऊतांचा घणाघात

दहशतवादी सरकार बारसूमध्ये हत्याकांड घडवण्याच्या तयारीत; राऊतांचा घणाघात

Subscribe

हे सरकार दहशतवादी मनोवृत्तीचं असून, बारसूमध्ये हत्याकांड घडवण्याच्या तयारीत आहे, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात केला आहे.

राजापूर तालुक्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. रस्त्यावर झोपून महिलांनी पोलिसांची गाडी अडवली आहे. बारसूत रिफायनरीला स्थानिकांनी विरोध केला आहे. आता यावर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. तसचं, हे सरकार दहशतवादी मनोवृत्तीचं असून, बारसूमध्ये हत्याकांड घडवण्याच्या तयारीत आहे, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात केला आहे. ( Terrorist Government Prepares for Massacre in Barsu Sanjay Raut’s attack on Shinde Fadnavis Government )

कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. काल, सोमवारी हजारो लोकं त्या बारसूच्या माळरानावर जमले आहेत. आम्ही मरू, गोळ्या खाऊ पण इथून हटणार नाही, असं या आंदोलकांचं म्हणणं आहे आणि या राज्याचे उद्योगमंत्री पोलिसांना हाताशी धरुन बारसूच्या आंदोलकांवर ज्याप्रकारे खारघरला सदोष मनुष्य वध केला त्याप्रमाणे त्यांना धमक्या दिल्या जात आहेत की तुमच्यावर गोळ्या झाडू. 5 ते 6 हजार कुटुंब आज त्या माळरानावर बारसूच्या रिफायनरीला विरोध करण्यासाठी जमले आहेत. अनेक कुटुंब परागंदा झालेली आहेत. अनेक कुटुंबांना पोलिस स्थानकात बसवून धमक्या दिल्या जात आहेत. हजारो लोकांना तडीपार होण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. इतकंच काय तर बारसूचे जे लोक मुंबईत राहतात आणि त्यांचा विरोध आहे या प्रकल्पाला त्यांच्या मुंबईतील घरात लाथा मारुन पोलीस घुसत असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे.

- Advertisement -

…..तर जालियनवाला हत्याकांड होईल 

रिफायनरीच्या आंदोलकांचा विरोध केला जात आहे. हे अतिशय विकृत मनोवृत्तीचं सरकार आहे. दहशतवादी मनोवृत्तीचं सरकार आहे. बारसूच्या माळरानावर जमलेले हजारो लोक जर मागे हटले नाही तर आम्हाला भीती आहे की ते या आंदोलकांवर गोळ्या झाडतील आणि जालियनवाला हत्याकांडाप्रमाणे बारसूचं हत्याकांड होईल, अशी आम्हाला भीती. त्यामुळे उद्धव ठाकरे यात लक्ष घालत आहेत. कदाचित या सर्व प्रकरणावर मुंबईला त्यात लक्ष घालावं लागेल.

( हेही वाचा: रिफायनरी सर्वेक्षणाचा वाद पेटला, रस्त्यावर झोपून महिलांनी अडवली पोलिसांची गाडी )

- Advertisement -

आव्हाड यांचं ट्वीट 

बारसू सोलगाव पंचक्रोशीतील 100 टक्के नागरिकांनी त्या ठिकाणी येणाऱ्या रिफायनरीला विरोध केला आहे. तेथील गावकऱ्यांनी 3 महिन्यांपूर्वी माझी भेट घेतली होती. त्या गावामधील जवळ जवळ 500-700 स्वतःच्या बोटी घेऊन मासेमारीला जाणारी लोक आहे. गावामधील 100 टक्के लोकांनी या रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला आहे. याच प्रकरणातून विरोधातील लोकांचे समर्थन करणाऱ्या पत्रकार शशिकांत वारीशे यांची काही महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली होती. गावामधील 100 टक्के लोकांचा जर विरोध असेल आणि ग्रामपंचायतीने देखील विरोधात ठराव केला असेल तर तो प्रकल्प तिथे होऊ देऊ नका असे कायद्यात म्हटले आहे. तरी देखील जोरजबरदस्ती करून तो प्रकल्प त्या ठिकाणी राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये कोणाकोणाच्या जमिनी आहेत ही जी माहिती बाहेर आली हे ती मोठी धक्कादायक आहे. स्थानिकांचाच हा प्रकल्प राबवायला विरोध आहे. त्यांची मागणी आहे की, त्या ठिकाणी उत्कृष्ट आयटी पार्कची निर्मिती करा. स्थानिकांना जे पाहिजे ते तिथे द्यायला हवं. त्यांच्या व्यथांचा सरकारने विचार करावा. 5000 लोक माळराणावर बसले आहेत हे कोकणचे आंदोलन आहे. कोकणी माणूस किती चिवट आहे ह्याची कल्पना सगळ्यांनाच आहे मोडीन पण वाकणार नाही हा कोकणी माणसाचा स्वभाव आहे. आंदोलन हलक्यात घेऊ नका, असं म्हणत आव्हाडांनी सरकारला इशारा दिला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -