घरराजकारणविरोधकांकडून 2024 ला पंतप्रधानपदासाठी चेहरा कोण? संजय राऊतांनी सांगितलं...

विरोधकांकडून 2024 ला पंतप्रधानपदासाठी चेहरा कोण? संजय राऊतांनी सांगितलं…

Subscribe

2024च्या पंतप्रधान पदासाठी कोण चेहरा असणार, यावरही राऊतांनी स्पष्ट भाष्य केलं आहे.

काॅंग्रेसचे महासचिव के.सी. वेणूगोपाल हे सोमवारी मुंबईत येणार आहेत. मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि के.सी. वेणूगोपाल यांची भेट होणार आहेत, अशी माहिती ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच, 2024 संपूर्ण विरोधक एकत्र असणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. 2024च्या पंतप्रधान पदासाठी कोण चेहरा असणार, यावरही राऊतांनी स्पष्ट भाष्य केलं आहे. Thackeray group leader Sanjay Raut talked about on Oppossition face for Prime minister 2024 Nitish Kumar

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सगळे विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. सगळ्या पक्षांच्या प्रमुखांची बैठक होत आहे. हे चांगले संकेत असल्याचं राऊत म्हणाले. तसेच, लवकरच राहुल गांधी, सोनिया गांधी महाराष्ट्रात येऊ शकतात, असही त्यांनी यावेळी सांगितलं. राहुल गांधी यांनी नितिश कुमार आणि तेजस्वी यादव यांची भेट घेतली. तसचं, दिल्लीत शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या झालेल्या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचं संजय राऊत यांनी सांगितले.

- Advertisement -

2024 ला 100 टक्के सत्तापरिवर्तन होणार

2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा भ्रमाचा भोपळा फुटणार. 100 टक्के यावेळी सत्तापरिवर्तन होणार आहे. ममता बॅनर्जी यांची देखील राहुल गांधी भेट घेणार आहेत. तसंच, राज्यात 48 जागांपैकी 40 जागांवर आम्ही जिंकू अशी तयारी असल्याचं राऊत यावेळी म्हणाले.

तो निर्णय नंतर

2024 ला विरोधकांकडून पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून नितिश कुमार यांचं नाव समोर येत आहे, असं विचारल्यावर संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान चेहऱ्यावर निर्णय झाला नाही. चर्चा झाली नाही. नितीश कुमार चेहरा असतील किंवा नसतील हे येणारा काळ ठरवेल. चेहऱ्यावर काही मतभेद होणार नाहीत. त्यावर नंतर चर्चा होईल. पण एकत्र येऊन सत्ता परिवर्तन करणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, असे राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

फडणवीसांना डीलची ऑफर

आमची एवढी भीती वाटते. आम्ही बोलू नये वाटत असेल तर बेकायदेशीर कृत्य थांबवा. कायद्याने राज्य करा. लांड्यालबाड्या करुन तुम्ही विरोधी पक्षांना त्रास देत असाल तर आम्ही बोलू. तुम्ही तुमची कारस्थानं थांबवा आम्ही तुमच्यावरचे हल्ले थांबवू. सरळ डील आहे. स्वीकारता का विचारा त्यांना? असा सवाल त्यांनी केला.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -