घररायगडमुंबई- पुणे द्रूतगती मार्गावर १३ वाहनांचा विचित्र अपघात

मुंबई- पुणे द्रूतगती मार्गावर १३ वाहनांचा विचित्र अपघात

Subscribe

मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर खोपोली एक्झिट जवळ गुरुवारी दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास तेरा वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सहा जण जखमी झाले आहेत. सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती असून याबाबत समाधान व्यक्त होत आहे.

खोपोली: सारिका सावंत
मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर खोपोली एक्झिट जवळ गुरुवारी दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास तेरा वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सहा जण जखमी झाले आहेत. सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती असून याबाबत समाधान व्यक्त होत आहे.
द्रूतगती मार्गावर खोपोली एक्झिट जवळ दुपारच्या वाजण्याच्या सुमारास तेरा वाहनांचा विचित्र अपघात झाला; हा अपघात नेमका कसा झाला याचा अद्याप उलगडा झालेला नसला तरी अचानक झालेल्या या अपघातामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती समजल्यानंतर बोरघाट महामार्ग पोलीस आयआरबी आणि डेल्टा फोर्स तसेच खोपोली येथील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते यांनी अपघात स्थळी धाव घेत सर्व वाहनांमधील जखमी आ इतर सर्व प्रवशांना वाहनांमधून बाहेर काढत उपचारासाठी रवाना केले.

भीषण आणि विचित्र अपघात
एकामागून एक अशा प्रकारे वाहने एकमेकांवर आदळली, यात काही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणार्‍या मार्गिकेवर वाहनांची मोठी कोंडी झाली होती. वाहने उतारावर अचानक एकमेकांना जोरात धडकल्याने हा भीषण आणि विचित्र अपघात झाला. यामध्ये अकरा चार चाकी वाहने आणि दोन ट्रक अशा तेरा वाहनांचा समावेश आहे.

- Advertisement -

जखमींवर प्राथमिक उपचार
अपघातात कुंदा सोनवणे (६०,ठाणे), कमल सोनवणे (३८,ठाणे), हर्षद घानेतकर (२५, पुणे), सदानंद भोईर (४५,ठाणे), मंथू थॉमस (८०, पुणे), इल्लेयमा इशू (६२, पुणे) हे जखमी झाले. या सर्वांवर नगरपालिका रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन घरी पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -