घररायगडरायगड जिल्ह्यात १९२ अवैध उत्खननावर कारवाई, मार्च अखेरपर्यंत १ कोटी ५३ लाखांचा...

रायगड जिल्ह्यात १९२ अवैध उत्खननावर कारवाई, मार्च अखेरपर्यंत १ कोटी ५३ लाखांचा दंड वसूल

Subscribe

रायगड जिल्ह्यातील वाळू, गिट्टी, मुरूम व माती इत्यादी गौण खनिजाचे स्वामित्वधन शुल्क आणि गौण खनिजाचे अवैध उत्खनन व अवैध वाहतुकीसंदर्भात दंडात्मक कारवाईतून २०२१-२२ या वर्षात २०२ कोटी ७० लाख रुपयांचे उद्दिष्ट जिल्हा खनिकर्म विभागाला देण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यात आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये १९२ अवैध उत्खननावर कारवाई करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय धाड पथकाने केलेल्या या कारवाईतून १ कोटी ५३ लाख ९ हजार २२० रुपये दंड वसूल केला आहे.

रायगड जिल्ह्यातील गौण खनिज महसूल वसुलीचे उद्दिष्ट आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी २०२ कोटी ७० लाख रुपये होते. मात्र, मार्च २०२२ अखेरपर्यंत १६०कोटी ७० लाख रुपये महसूल वसुली करण्यात गौण खनिज विभागाला यश आले आहे. गौण खनिज स्वामित्वधन शुल्क (रॉयल्टी) आणि अवैध उत्खनन व अवैध वाहतुकीपोटी दंडात्मक कारवाईतून ही रक्कम वसूल करण्यात आली आहे.

- Advertisement -

रायगड जिल्ह्यातील वाळू, गिट्टी, मुरूम व माती इत्यादी गौण खनिजाचे स्वामित्वधन शुल्क आणि गौण खनिजाचे अवैध उत्खनन व अवैध वाहतुकीसंदर्भात दंडात्मक कारवाईतून २०२१-२२ या वर्षात २०२ कोटी ७० लाख रुपयांचे उद्दिष्ट जिल्हा खनिकर्म विभागाला देण्यात आले आहे.या तुलनेत मार्च २०२२ अखेरपर्यंत १६०कोटी ७० लाख रुपये (७९.४४ टक्के) गौण खनिज महसूल वसुली करण्यात आली आहे. त्यामध्ये गौण खनिजाच्या स्वामित्वधन शुल्क (रॉयल्टी) आणि गौण खनिजाचे अवैध उत्खनन व अवैध वाहुकीपोटी दंडात्मक कारवाईतून वसूल करण्यात आलेल्या रकमेचा समावेश आहे.

गौण खनिजाची महसूल वसुली ७९.४४ टक्के राहिल्याने जिल्हा खनिकर्म विभागाचे महसूल वसुलीचे उद्दिष्ट अपूर्ण राहिले आहे. गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीसंदर्भात कारवाई करण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशानुसार जिल्हा खनिकर्म अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आकस्मिक धाड पथक स्थापन करण्यात आले होते. या पथकामार्फत गत वर्षात गौण खनिजाच्या अवैध १९२ अवैध उत्तखननावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

गौण खनिज महसूल वसुली उद्दिष्टाच्या तुलनेत नोव्हेंबर अखेरपर्यंत ७९.४४ टक्के महसूल वसुली करण्यात आली असून, जिल्हास्तरीय आकस्मिक धाड पथकाने गौण खनिज अवैध वाहतूक संदर्भात केलेल्या दंडात्मक कारवाईतून एक कोटी रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला आहे.दीड वर्ष कोरोनाच्या महामारीत गेले. मात्रस तरीही जिल्ह्याला मोठे उद्दिष्ट शासनाकडून मिळालेले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत.
-आर. आर. मेश्राम, जिल्हा खनिकर्म अधिकारी, रायगड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -