घररायगडजिल्ह्यातील सर्व पोलीस चेकपोस्ट बंद; गृह विभागाने लक्ष देण्याची गरज

जिल्ह्यातील सर्व पोलीस चेकपोस्ट बंद; गृह विभागाने लक्ष देण्याची गरज

Subscribe

१९९३ सालच्या मुंबईतील बाँबस्फोट मालिकेनंतर जिल्ह्यातील पोलिसांची सागरीगस्त सुरू आहे. त्यानंतर वाहनांच्या तपासणीसाठी जिल्ह्यातील समुद्राकडून मुंबई -गोवा महामार्गाकडे जाणार्‍या सर्व मार्गांवरती पोलीस चेक पोस्ट उभारण्यात आली होती. यामध्ये कोळे, म्हसळे , वांगणी चेकपोस्ट ही श्रीवर्धन आणि म्हसळे तालुक्यात कार्यरत होती. परंतु मागील काही दिवसांपासून ही पोलीस चेक पोस्ट बंद झाल्यामुळे कोणत्याही वाहनांची तपासणी या ठिकाणी केली जात नाही. त्यामुळे १९९३ सालची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची स्थिती आहे. परंतु राज्याच्या गृह विभागाकडून या संपूर्ण गोष्टीकडे दुर्लक्ष हपोत असल्याचे दिसून येत आहे.

श्रीवर्धन: १९९३ सालच्या मुंबईतील बाँबस्फोट मालिकेनंतर जिल्ह्यातील पोलिसांची सागरीगस्त सुरू आहे. त्यानंतर वाहनांच्या तपासणीसाठी जिल्ह्यातील समुद्राकडून मुंबई -गोवा महामार्गाकडे जाणार्‍या सर्व मार्गांवरती पोलीस चेक पोस्ट उभारण्यात आली होती. यामध्ये कोळे, म्हसळे , वांगणी चेकपोस्ट ही श्रीवर्धन आणि म्हसळे तालुक्यात कार्यरत होती. परंतु मागील काही दिवसांपासून ही पोलीस चेक पोस्ट बंद झाल्यामुळे कोणत्याही वाहनांची तपासणी या ठिकाणी केली जात नाही. त्यामुळे १९९३ सालची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची स्थिती आहे. परंतु राज्याच्या गृह विभागाकडून या संपूर्ण गोष्टीकडे दुर्लक्ष हपोत असल्याचे दिसून येत आहे.
१२ मार्च १९९३ रोजी झअलेल्या बाँबस्फोटाच्या तपासाची चक्र फिरू लागल्यानंतर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी आरडीएक्स नावाचे स्फोटक वापरण्यात आले होते. सदरची स्फोटके श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी बंदरात उतरवली गेल्याचे निष्पन्न झाले. श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे तात्कालीन पोलीस उपनिरीक्षक, केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी या प्रकरणामध्ये टाडा कायद्याखाली अटक होते. याशिवाय ही स्फोटके उतरविण्यासाठी ज्यांनी मदत केली होती व सहभाग घेतला होता, अशा देखील अनेकांना टाडा कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती. त्यानंतर राज्याच्या गृह विभागाने श्रीवर्धन व संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सागरी सुरक्षेसाठी खाजगी बोटी भाडेतत्त्वावर घेऊन तटरक्षक दल, पोलीस व केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग यांची संयुक्त गस्त सुरू केली होती. परंतु कालांतराने ही गस्त बंद होऊन आता पोलिसांची सागरीगस्त सुरू आहे. त्यानंतर वाहनांच्या तपासणीसाठी जिल्ह्यातील कोळे चेकपोस्ट,म्हसळे , वांगणी येथे ही चेकपोस्ट कार्यरत होती. मात्र आता ती बंद आहेत.
चेक पोस्टमुळे कोकणात येणार्‍या पर्यटकांना देखील याच चेकपोस्ट वरती चेकिंगला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे पर्यटकांवरती देखील एक प्रकारे चाप बसत होता. २०२२ सालच्या जुलै महिन्यात हरिहरेश्वर समुद्रकिनारी एक अज्ञात बोट सापडली होती. त्यामध्ये एके ४७ सारख्या बंदुका देखील सापडल्या होत्या. त्यानंतर गृह विभाग व पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले होते. मात्र बंद असलेली चेक पोस्ट सुरू करण्यासाठी पोलिसांकडून का वेळ काढू पणा केला जात आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लक्ष घालावे जेणेकरून सर्व पोलीस चेक पोस्ट पुन्हा कार्यरत व्हावीत, अशी मागणी होत आहे.

सर्वच चेक पोस्टला टाळे
समुद्र किनारपट्टीच्या भागात समुद्र मार्गे स्फोटके, शस्त्रास्त्रे किंवा अतिरेकी येऊ शकतात. त्यामुळे कोकणातील सर्व चेक पोस्ट कार्यरत असणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु याकडे गृह विभागाने व पोलीस खात्याने पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. सदर चेक पोस्टमुळे अनेक वाहन चालकांना त्या ठिकाणी वाहने चेकिंगसाठी थांबवावी लागत होती. परंतु सध्या सर्वच चेक पोस्टला टाळे ठोकलेली पाहायला मिळत आहेत.

- Advertisement -

ज्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलीस चेकपोस्ट आहेत, अशा पोलीस ठाण्यात कर्मचार्‍यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच सर्व पोलीस चेकपोस्ट कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
– अतुल झेंडे,
अपर पोलीस अधीक्षक, अलिबाग, रायगड.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -