घररायगडमाथेरानच्या लाल क्ले-पेव्हर ब्लॉकवर धावली ई-रिक्षा  

माथेरानच्या लाल क्ले-पेव्हर ब्लॉकवर धावली ई-रिक्षा  

Subscribe

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रयोगिक तत्वावर तीन महिने ई-रिक्षा सुरू राहणार आहे.नगरपालिकेने सर्व विभागाच्या परवानग्या घेऊन येथील सनियंत्रण समितीच्या आदेशाने अनेक अडचणी दूर करत पर्यावरण पूरक ई-रिक्षा सुरू केली आहे.या ऐतिहासिक क्षणी ई-रिक्षाच्या स्वागतासाठी शालेय विद्यार्थी,दिव्यांग बांधव तसेच महिला वर्गाने पुष्पवृष्टी करत ई-रिक्षाचे जल्लोषात स्वागत केले.

 

दिनेश सुतार/ माथेरान
अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानच्या लाल क्ले-पेव्हर ब्लॉकवर ई-रिक्षा धावली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रयोगिक तत्वावर तीन महिने ई-रिक्षा सुरू राहणार आहे.नगरपालिकेने सर्व विभागाच्या परवानग्या घेऊन येथील सनियंत्रण समितीच्या आदेशाने अनेक अडचणी दूर करत पर्यावरण पूरक ई-रिक्षा सुरू केली आहे.या ऐतिहासिक क्षणी ई-रिक्षाच्या स्वागतासाठी शालेय विद्यार्थी,दिव्यांग बांधव तसेच महिला वर्गाने पुष्पवृष्टी करत ई-रिक्षाचे जल्लोषात स्वागत केले.
दुपारी १२ वाजता माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी येथे पनवेल परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक संदीप कित्ते,सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक भाऊसाहेब कदम,येथील प्रशासक तथा मुख्याधिकारी मुख्याधिकारी सुरेखा भणगे-शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत ई-रिक्षा परिवहनाला सुरुवात केली.यावेळी याचिकाकर्ते सुनील शिंदे,अधिक्षक दिशांत देशपांडे, माथेरानचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शेखर लव्हे, माथेरान परीवनक्षत्र अधिकारी उमेश जंगम, नगराध्यक्ष मनोज खेडकर,माजी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत श्रमिक रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल, उपाध्यक्ष प्रकाश सुतार उपस्थित होते.एकुण पाच ई-रिक्षा धावत असून आणखी दोन रिक्षाची भर पडणार आहे.या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत सर्वप्रथम दिव्यांग आणि शालेय विद्यार्थ्यांना प्रवास करण्याचा मान मिळाला.
या ई-रिक्षाचे नियोजन नगरपालिकेतर्फे केले गेले असून सकाळी ६ ते रात्रौ १०.३० वाजे पर्यंत ई-रिक्षा धावणार असून एकूण २६ कर्मचारी या कामी लावले आहे. एकूण १६ चालक,६ तिकीट निरीक्षक कर्मचारी आणि २ देखरेख कर्मचारी व दोन इतर कामे करणारे कर्मचारी असणार आहेत.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत सोमवारी माथेरानमध्ये ई-रिक्षा धावण्यास सुरुवात झाली आहे.या सोनेरी क्षणाचे सोबती दिव्यांग बांधव व शालेय विद्यार्थी झाले याच समाधान आहे.एक प्रवासाचा आणखी एक पर्याय नागरिक,पर्यटक याना मिळणार आहे.इतर वाहनापेक्षा ई-रिक्षा तिकीट दर कमी असून कमी वेळात इच्छित स्थळी पोहोचता येईल.
– सुनील शिंदे,याचिकाकर्ते

माझ्या घरापासून शाळेचं अंतर पाच किलोमीटर आहे.त्यामुळे पाठीवर दफ्तर घेऊन जाताना खूप दमछाक होत होती त्यामुळे थकवा जाणवायचा पण ई-रिक्षामुळे आमचा वेळ सुद्धा वाचणार आहे.आमचे आरोग्य व्यवस्थित राहणार आहे व अभ्यास करायला वेळही मिळणार आहे.
-ऋत्विक चंद्रकांत चावरे,
विद्यार्थी, इयत्ता ८ वी

- Advertisement -

मी ज्या ठिकाणी काम करतो ते अंतर तीन किलोमीटर आहे.त्यामुळे येऊनजाऊन ६ किलोमीटर रोज पायपीट करावी लागायची पण आज ई रिक्षा आली आणि आम्हा दिव्यांगांना जगण्याची उमेद मिळाली.आता कमी खर्चात काम करून घरी येऊ शकतो त्यामुळे आमचे स्वास्थ्य चांगले राहील.
– तानाजी कदम, दिव्यांग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -