घररायगडजिल्हा किनारी ‘बिपरजॉय’चा धोका; प्रशासनाकडून मच्छिमारांसह नागरीकांना दक्षतेचे आवाहन

जिल्हा किनारी ‘बिपरजॉय’चा धोका; प्रशासनाकडून मच्छिमारांसह नागरीकांना दक्षतेचे आवाहन

Subscribe

प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या पूर्व सूचनेच्या अनुषंगाने अरबी समुद्रात ‘बिपर जॉय’ नावाचे चक्रीवादळ तयार झालेले असून या वादळामुळे ९ ते १२ जून या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जावू नये. तसेच जे मच्छिमार मासेमारीसाठी समुद्रात गेलेले असतील त्यांनी किनारी परत यावे. या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असून तसेच समुद्र किनारी वेगाने वारे वाहणार असल्याने नागरिकांनी तसेच पर्यटकांनी समुद्र किनारी (बिचेसवर) जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

अलिबाग: प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या पूर्व सूचनेच्या अनुषंगाने अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ नावाचे चक्रीवादळ तयार झालेले असून या वादळामुळे ९ ते १२ जून या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जावू नये. तसेच जे मच्छिमार मासेमारीसाठी समुद्रात गेलेले असतील त्यांनी किनारी परत यावे. या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असून तसेच समुद्र किनारी वेगाने वारे वाहणार असल्याने नागरिकांनी तसेच पर्यटकांनी समुद्र किनारी (बिचेसवर) जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर काही ठिकाणी किमान ४० ते कमाल ६० किमी प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे. या कालावधीत जिल्ह्यातील पर्जन्यमान स्थिती अंदाजित केली असून त्यानुसार शनिवारी, १० जून रोजी जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वार्‍याची शक्यता असून प्रति तास ३०-४० किलोमीटर वेगाने वारे वाहतील तसेच ढगांच्या गडगडाटासह पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तवली आहे. अरबी समुद्र आणि गोवा-महाराष्ट्र किनार्‍याजवळ आणि बाहेर ३५-४५ किमी प्रति तास वेगाने तर कमाल ५५ किमी वारे वाहण्याची शक्यता आहे. ११ जून रोजी अरबी समुद्र आणि गोवा महाराष्ट्र किनार्‍याजवळ आणि बाहेर ३५-४५ किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच जिल्ह्यातील काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचे पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे तर १२ जून रोजी जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचे पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. कर्नाटक-गोवा महाराष्ट्र किनार्‍याजवळ समुद्र खवळलेला राहणार आहे. आणि समुद्राजवळून ४०-५० किमी तर कमाल ५५ ते ६० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

आपत्कालीन मदतीसाठी संपर्क क्रमांक
जिल्हा नियंत्रण कक्ष-०२१४१-२२२०९७
जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष-०२१४१-२२८४७३ टोल फ्री नं.११२
प्रादेशिक बंदर विभाग नियंत्रण कक्ष-०२१४१-२२२७४६

- Advertisement -

बॉक्स,,,
तालुका नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक
तालुका      दूरध्वनी क्रमांक   तहसिलदार                   संपर्क क्रमांक
१.अलिबाग ०२१४१-२२२०५४,  विक्रम पाटील,               ८८७९३४३४०१
२. पेण ०२१४३-२५२०३६,      श्रीमती स्वप्नाली डोईफोडे    ९९२१८७३१५९
३. मुरुड ०२१४४-२७४०२६,    रोहन शिंदे                    ८०८७२४३७८९
४. पनवेल ०२२-२७४५२३९९,  विजय तळेकर,               ९४२०९१९९९२
५. उरण ०२२-२७२२२३५२,   उध्दव कदम,                  ८१०८५०४०३७
६. कर्जत ०२१४८-२२२०३७, , शितळ रसाळ                 ८०८७५१३०८३
७. खालापूर ०२१९२-२७५०४८, आयुब तांबोली,                ९९७५७५१०७६
८. माणगाव ०२१४०-२६२६३२, विकास गारुडकर              ९०४९९२९९१४
९.तळे ०२१४०-२६९३१७/७०६६०६९३१७  स्वाती पाटील    ९६५३४४८५७८
१०.रोहे ०२१९४-२३३२२२,     डॉ.किशोर देशमुख,           ९९६०२४८९९९
११.पाली ०२१४२-२४२६६५, उत्तम कुंभार         ९४२२८४०६२५/९९७५६५५३७५
१२.महाड ०२१४५-२२२१४२, सुरेश काशिद           ९९२१३३२६९५/८१८०९३२४८५
१३.पोलादपूर ०२१९१-२४००२६, समीर देसाई,             ९६७३१६३४७९
१४.म्हसळा ०२१४९-२३२२२४, समीर घारे                 ९५०३७०७३७०
१५.श्रीवर्धन ०२१४७-२२२२२६ महेंद्र वाकलकर             ७०३८७५४८२२

१६.अधीक्षक माथेरान- ०२१४८-२३०२९४ दिक्षात देशपांडे ८६६९०५६४९२

- Advertisement -

प्रशासनाकडून खबरदारीच्या सूचना
जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा , कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व अफवा पसरवू नये, कोणत्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्राकडून करून घ्यावी, तसेच शनिवारपासून ३ दिवसाच्या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असल्याने नागरिकांनी समुद्रात जावू नये, पोहण्यासाठी समुद्रात उतरू नये, समुद्राच्या ठिकाणी सेल्फी काढू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष डॉ. योगेश म्हसे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -