घररायगडगंधारपाले बौध्द लेण्यांवर विद्युत व्यवस्था करण्याची मागणी

गंधारपाले बौध्द लेण्यांवर विद्युत व्यवस्था करण्याची मागणी

Subscribe

ऐतिहासिक तालुका म्हणून ओळखल्या महाडमधील हजारो वर्षांचा बौद्धकालीन वारसा असलेल्या गंधारपाले येथील बौद्ध कालीन लेण्यांवर विद्युत दिवे, तसेच पर्यकांसाठी मुलभुत सुविधा पुरविण्याची मागणी भाजपा तालुका सरचिटणीस महेश शिंदे यांनी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे केली आहे.

गंधारपाले बौध्द लेण्यांवर विद्युत व्यवस्था करण्याची मागणी
महाड:  ऐतिहासिक तालुका म्हणून ओळखल्या महाडमधील हजारो वर्षांचा बौद्धकालीन वारसा असलेल्या गंधारपाले येथील बौद्ध कालीन लेण्यांवर विद्युत दिवे, तसेच पर्यकांसाठी मुलभुत सुविधा पुरविण्याची मागणी भाजपा तालुका सरचिटणीस महेश शिंदे यांनी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे केली आहे.
तालुक्याला जसा ऐतिहासिक वारसा आहे तसाच क्रांतीकारी चळवळींचाही वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आणि समाधीस्थळ किल्ले रायगड परिसराचा विकास विविध पध्दतीने होत आहे. याच धर्तीवर हजारों वर्षांचा इतिहास सांगणार्‍या गंधारपाले येथील बौद्धकालीन लेण्याचे सुशोभीकरण व्हावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र पुरातत्व विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. महाड क्रांतीभूमितील या लेण्यांवर हजारो बौध्द अनुयायी व पर्यटक येत असतात. मात्र या ठिकाणी कोणत्याच सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांचे हाल होतात. गेली अनेक वर्ष पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेल्या या लेण्यांचे सुशोभीकरण आणि मुलभूत सुविधा असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. याबाबत भाजपाचे तालुका सरचिटणीस शिंदे यांनी राज्याचे पर्यटन मंत्री लोढा यांचे लक्ष वेधण्यासाठीत्यांना निवेदन सादर केले आहे. एका निवेदनाद्वारे सुशोभीकरण आणि विद्युत दिव्यांची सोय व्हावी तसेच या ठिकाणी पर्यटकांसाठी निवारा शेड ही उभारण्यात येऊन माहिती दर्शविणारे फलक लावण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -