घररायगडविकास कामांसाठी आडकाठी नको- खासदार तटकरे  

विकास कामांसाठी आडकाठी नको- खासदार तटकरे  

Subscribe

सार्वजनिक धरणाचे पाणी हे सर्वांसाठी उपलब्ध असून त्याच्यावर कोणाचीही मालकी हक्क, अधिकार होऊ शकत नाही. त्यामुळे कोणीही कुठल्याही प्रकारे विरोध न करता सांमजस्याची भूमिका घेतली पाहिजे. शासकीय भूखंडावरील लोकोपयोगी विकास कामांसाठी कोणी आडकाठी करु नये, तसे प्रतिपादन करतानाच तसे केल्यास कायदेशीर मार्गाने कारवाई केली जाईल असा इशारा खासदार सुनिल तटकरे यांनी येथे दिला.

म्हसळे: सार्वजनिक धरणाचे पाणी हे सर्वांसाठी उपलब्ध असून त्याच्यावर कोणाचीही मालकी हक्क, अधिकार होऊ शकत नाही. त्यामुळे कोणीही कुठल्याही प्रकारे विरोध न करता सांमजस्याची भूमिका घेतली पाहिजे. शासकीय भूखंडावरील लोकोपयोगी विकास कामांसाठी कोणी आडकाठी करु नये, तसे प्रतिपादन करतानाच तसे केल्यास कायदेशीर मार्गाने कारवाई केली जाईल असा इशारा खासदार सुनिल तटकरे यांनी येथे दिला.
तालुक्यातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी पंचायत समितीमध्ये आयोजित सभेत खासदार तटकरे बोलत होते. मुबलक पाणी पुरवठा असलेल्या खरसई धरण योजने अंतर्गत म्हसळा तालुक्यातील तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतील ८ गावे आणि ४ वाड्यांसाठी जलजीवन मिशन योजने अंतर्गत ११कोटी रुपयांची नवीन योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेच्या कामाला सुरुवात झाली असून खरसई ग्रामस्थ व ग्राम पंचायत प्रशासन यांचे गैरसमजुतीमधून योजनेची मुळ विहीर करण्यास गेली दोन महिने ग्रामस्थांकडून विरोध होत आहे, असे खासदार तटकरे यांच्या निदर्शनास आणून दिले असता त्यांनी संबंधीतांना सूचक इशारा दिला. यावेळी प्रांताधिकारी अमित शेडगे,तहसीलदार समिर घारे, गटविकास अधिकारी बाळासाहेब पोळ,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष समीर बनकर, माजी सभापती बबन मनवे, जिल्हा चिटणीस महादेव पाटील,नगराध्यक्ष असहल कादीरी,उपनगराध्यक्ष सुनिल शेडगे,मधुकर गायकर, संदीप चाचले,छाया म्हात्रे,मिना टिंगरे,महिला अध्यक्षा सोनल घोले,रेश्मा काणसे, शगुप्ता जहांगिर, सरपंच वेटकोळी,सरपंच प्रियंका निंबरे, मुख्याधिकारी मनोज उकिर्डे,सहय्यक अभियंता शेट्ये, महावितरणचे अभियंता पटवारी, पंचायत समिती कक्ष अधिकारी दिघीकर आदी उपस्थित होते.

निधीतून होणार विविध विकासकामे
संसद ग्राम योजनेतून गाव विकासासाठी दत्तक घेतलेल्या खरसई गावाला ५० लक्ष रुपयांच्या मंजूर निधीचे पत्र खरसई सरपंच आणि ग्रामस्थांकडे सुपुर्द केला. विकास कामांमध्ये प्रामुख्याने खरसई येथे दिवाबत्ती सोय,बाजारकट्टे,अंतर्गत रस्ते व इतर सुखसोई,बौध्दवाडी स्मशानभूमी जवळ धर्मशाळा बांधकाम,मुस्लीम मोहल्ला सामाजिक सभागृह तसेच महादेव कोळी समाज धार्मिक विधी शेड उभारण्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

- Advertisement -

पाणी टंचाई प्रश्नी निर्देश
सभेत मेंदडी धरण पाणी आटल्याने आजूबाजूच्या वारळ,काळसुरी,मेंदडी आणि मेंदडीकोंड वरील मोठ्या लोकवस्तीत प्रचंड पाणी टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे.अशा वेळी पुढील उपाय योजना म्हणून दास ऑफसर्स, रस्ते विकासक जे.एम.म्हात्रे आणि प्राधिकरण विभाग यांच्या मदतीने धरणातील गाळ काढण्याचे आदेश खासदार तटकरे यांनी म्हसळे तालुक्याशी संबंधीत उपस्थित अधिकार्‍यांना दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -