घररायगडपेणमधील पाच आदिवासी वाड्यांमध्ये वीज, रस्ता नाही; पाण्यासाठीही करावी लागते पायपीट

पेणमधील पाच आदिवासी वाड्यांमध्ये वीज, रस्ता नाही; पाण्यासाठीही करावी लागते पायपीट

Subscribe

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा होत असताना अजूनही काही भाग वीज, पाणी, रस्ते यासह अन्य मूलभूत गरजांपासून वंचित असल्याच्या बातम्या वाचनात येत असतात. त्यात तालुक्यात पाच आदिवाशी वाड्यांचाही समावेश करण्यासारखी स्थिती असून तांबडी,काजूची वाडी,खऊसावाडी,केलीची वाडी आणि उंबरमाला या वाड्या आजही पाणी, रस्ता आणि वीजेच्या प्रतीक्षेत आहेत.

मितेश जाधव: पेण
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा होत असताना अजूनही काही भाग वीज, पाणी, रस्ते यासह अन्य मूलभूत गरजांपासून वंचित असल्याच्या बातम्या वाचनात येत असतात. त्यात तालुक्यात पाच आदिवाशी वाड्यांचाही समावेश करण्यासारखी स्थिती असून तांबडी,काजूची वाडी,खऊसावाडी,केलीची वाडी आणि उंबरमाला या वाड्या आजही पाणी, रस्ता आणि वीजेच्या प्रतीक्षेत आहेत.येथील नागरिक आपल्या कुटुंबातील रुग्णाला डोली करून रुग्णालयात नेतात,मुलांना तीन किलोमीटर चालत शाळेत जावे लागते,तर पाण्यासाठी दीड ते दोन किलोमीटर पायपीट करीत डबक्यातले पाणी आणून प्यावे लागते. विशेष म्हणजे येथील नागरिकांनी आजपर्यंत मतदानच केले नसल्याची धक्कदायक बाब उघडकीस आली आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन येथील नागरिक शासन आणि प्रशासनाकडे गेले मात्र अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. एकीकडे शासनाने करोडो रुपये खर्च करून जलजीवन मिशन योजना राबविली आहे,मात्र त्याचा फायदा येथील आदिवासी नागरिकांना झालाच नाही.त्यामुळे अनेक वर्षापासून येथील नागरिक पाणी,वीज,रस्ते आणि मतदानापासून वंचित राहिले आहेत,या पाच वाड्या मिळून आमची स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी अशी त्यांनी मुख्य मागणी असून,आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

या भागातील आदिवासी बाधवांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. आम्ही रायगड जिल्हाच्या पालकमंत्री यांना सुद्धा या विषयी माहिती दिली होती तरी सुद्धा आदिवासी वाड्या सुविधांपासून वंचित आहेत.
– संतोष ठाकूर
सामाजिक कार्यकर्ते

- Advertisement -

लहान मुलांना, वयोवृद्ध माणसानं पावसाळी गढूळ पाणी असल्याने खूप त्रास होत आहे तसेच उन्हाळ्यात पाण्याचा खुप तुटवडा पडत असल्याने कधी तर पाणी मिळत नाही त्यामुळे काहींना रात्री पाणी भरावे लागत आहे. आम्ही ग्रामपंचायतीला तक्रार करून सुद्धा दखल घेतली जात नाही.
– नीलम वाघ,
ग्रामस्थ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -