घररायगडकुलाबाबरोबरच हिराकोट किल्ल्यावरही प्रार्थनास्थळ पुरातत्व विभागाच्या डोळेझाकीवर प्रकाश

कुलाबाबरोबरच हिराकोट किल्ल्यावरही प्रार्थनास्थळ पुरातत्व विभागाच्या डोळेझाकीवर प्रकाश

Subscribe

छत्रपती शिवरायांच्या अजरामत किल्ल्यांवर नव्याने प्रार्थनास्थळे उभारण्याच्या कृतीने काल पुढची मजल गाठली.अलिबागच्या समुद्रात उभा असलेल्या आणि हिंदवी स्वराज्याची सागरी राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कुलाबा किल्ल्यावर प्रार्थनास्थळ उभारण्यात आले आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

दोनच दिवसांपूर्वी रायगड किल्ल्यावर प्रार्थनास्थळ उभारण्यात आल्याची बाब राजे संभाजी छत्रपती यांनी पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांना पत्र पाठवून निदर्शनात आणली होती. खात्याच्या अधिकार्‍यांनी रायगडावरील प्रार्थनास्थळ उद्ध्वस्त करून दोन दिवस नाही होत तोच कुलाबाच्या हिराकोट किल्ल्यात प्रार्थनास्थळ उभारण्यात आल्याचे लक्षात येताच एकच संताप व्यक्त होऊ लागला आहे. याच किल्ल्यात माघी गणेश जयंतीच्यानिमित्ताने मंडपाचे खांब उभारण्यात आले तेव्हा आक्षेप घेणारे पुरातत्व खात्याचे अधिकारी किल्ल्याच्या तटबंदीवर अनधिकृत बांधकाम होत असताना काय करत होते, असा सवाल केला जात आहे.

- Advertisement -

यासंबंधी रघुजीराजे आंग्रे यांनी फेसबुकवर पोस्ट करत पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांची झोप उडवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील शेवटचे बांधकाम असलेल्या किल्ल्यात कोणाचीही समाधी असल्याचा कागदोपत्री उल्लेख अथवा नोंद नाही. असे असताना अचानक त्याठिकाणी प्रार्थनास्थळ अथवा समाधी कोणी बांधली, अशी विचारणा रघुजीराजे आंग्रे यांनी केली आहे.

याच प्रकारे अलिबाग शहरातील हिराकोट किल्ल्याच्या समोरच रस्त्याच्या मध्यभागी एक अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. हिंदू-मुस्लीम समाजातील अनेक जण स्वराज्यासाठी लढले. त्यांचा आदरच आहे. मात्र, किल्ल्यावर आणि किल्ल्याच्या परिसरात अशा प्रकारे अनधिकृतपणे बांधकामे, अतिक्रमण करणे चुकीचे असल्याचे रघुजीराजे आंग्रे यांनी म्हटले आहे. याप्रकरणी त्यांनी पुरातत्व विभागाकडे पुराव्यासहित तक्रार केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -