घररायगडसुधागडात भाजपामध्ये ‘इन्कमिंग’; रायगडमध्ये शेकापला धक्का 

सुधागडात भाजपामध्ये ‘इन्कमिंग’; रायगडमध्ये शेकापला धक्का 

Subscribe

सुधागड तालुक्यातील राजकीयदृष्ठ्या अत्यंत महत्त्वाचे समजल्या जाणार्‍या अढूळसा ग्रामपंचायत हद्दीतील अढूळसा गावच्या शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.पाली येथील झाप येथे रायगड भाजपच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम प्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या सर्व कार्यकर्त्यांच्या गळ्यात भाजपची शाल घालून स्वागत केले.

पाली: सुधागड तालुक्यातील राजकीयदृष्ठ्या अत्यंत महत्त्वाचे समजल्या जाणार्‍या अढूळसा ग्रामपंचायत हद्दीतील अढूळसा गावच्या शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.पाली येथील झाप येथे रायगड भाजपच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम प्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या सर्व कार्यकर्त्यांच्या गळ्यात भाजपची शाल घालून स्वागत केले.
शेकापक्षचे ज्येष्ठ नेते महादू दळवी, माजी सरपंच भाऊराव कोकरे नाडसूड विभाग चिटणीस ज्ञानेश्वर फोंडे,दुर्गेश हंबीरे, अडुळसा ग्रामपंचायतचे माजी सदस्य भगवान दळवी, रघुनाथ बावदाने,गणेश बावदाने, माजी उपसरपंच लुमा हंबीर, मारुती जाधव ,रमेश ठोंबरे,सटूराम पोंगडे, नामदेव कदम, एकनाथ जाधव, काळूराम जाधव ,पांडुरंग हंबीर ,मंगेश हंबीर, माळू बावदाने, राम केंडे, गणेश बावदाने यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
कार्यक्रमासाठी सतीश धारप, युवानेते वैकुंठ पाटील,जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, तळा तालुकाध्यक्ष अ‍ॅड. निलेश रातवडकर,बिपीन म्हामुणकर, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस रवी मुंढे,जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष अमित घाग, जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष वैशाली मपारा, जिल्हा उपाध्यक्ष श्रेया गुंठे, सुधागड तालुकाध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर, रोहा तालुकाध्यक्ष सोपान जांबेकर, महाड तालुका अध्यक्ष जयवंत दळवी, गीता पालरेचा, आरती भातखंडे, सचिन मोदी, माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र गांधी, रमेश साळुंके, विकास माने, आलाप मेहता, सागर मोरे, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -