घररायगडपाणी चोरावर पाटबंधारे विभागाचे प्रेम आले दाटून, फॉर्म हाऊसवर कारवाईचा आदेश ठरला...

पाणी चोरावर पाटबंधारे विभागाचे प्रेम आले दाटून, फॉर्म हाऊसवर कारवाईचा आदेश ठरला देखावा

Subscribe

कर्जत तालुक्यातील उल्हास पेजनदीतून विना परवानगी मोटार टाकून फॉर्म हाऊस मालक पाणीचोरी करीत असल्याची बातमी आपलं महानगर ने प्रसिद्ध केल्यानंतर खळबळून जागे झालेल्या पाटबंधारे विभागाचे उपअभियंता भरत गुंटुरकर यांनी शुक्रवारी १० फेब्रुवारी रोजी पाणीचोर फॉर्म हाऊस मालकांवर कारवाई करण्याचे आदेश सिंचन शाखा साळोख येथील दफ्तर कारकून म. वि. भुजबळ यांना दिले होते.

प्रेमात लोक सर्वस्व अर्पण करतात… बादशाह शहाजहानने तर प्रेमासाठी ताजमहलच बांधला…आणि आजच्या डेज संस्कृतीत तर ’व्हॅलेन्टाईन डे’ ला अद्वितीय महत्व आहे. या दिवशी प्रियकर प्रेयसींसाठी गिफ्टच गिफ्ट देत असतो. जुन्या प्रेमाची आठवण ठेवत आज पाटबंधारे विभागानेही उल्हास पेजनदीतून ’पाणीचोरी’ करणार्‍या फॉर्म हाऊस मालकाला अनोखी प्रेमाची गिफ्ट दिली.

कर्जत तालुक्यातील उल्हास पेजनदीतून विना परवानगी मोटार टाकून फॉर्म हाऊस मालक पाणीचोरी करीत असल्याची बातमी आपलं महानगर ने प्रसिद्ध केल्यानंतर खळबळून जागे झालेल्या पाटबंधारे विभागाचे उपअभियंता भरत गुंटुरकर यांनी शुक्रवारी १० फेब्रुवारी रोजी पाणीचोर फॉर्म हाऊस मालकांवर कारवाई करण्याचे आदेश सिंचन शाखा साळोख येथील दफ्तर कारकून म. वि. भुजबळ यांना दिले होते. सोमवारी १४ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देवून कारवाई करण्याचे हे आदेश देण्यात आले. पण सोमवारी ’पाणीचोर’ फॉर्म हाऊस मालकावर पाटबंधारे विभागाचे प्रेम दाटून आल्याचे चित्र दिसून आले. याबाबत माहिती घेतली असता उपअभियंता भरत गुंटुरकर म्हणाले की, मला एकच काम नाही. पत्र काढले आहे, कारवाई होईल, अशा शब्दांत त्यांनी टोलवाटोलवी केली. तर भुजबळ मॅडम म्हणाल्या की, मला सोमवारी आणि मंगळवारी ठाणे येथे ड्यूटी असते व कारवाई करण्याचा मला अधिकारच नाही. वरिष्ठांनी फोनवर आदेश दिला आहे. तसेच व्हॉट्स अपला लेटर ही पाठविले आहे. पण हातात प्रत न मिळाल्याने मी काहीच करू शकत नाही.

- Advertisement -

पाटबंधारेचा सिंघम ठरला ’फुसकाबार’
शुक्रवारी ललीतकुमार एस. कनोडीया या फॉर्म हाऊस मालकाला पाटबंधारे कार्यालयात पाचारण केले होते. त्यांच्यावतीने फॉर्म हाऊसचे मॅनेजर उपअभियंता यांना भेटायला आले होते. पण त्यांनी कागदपत्रे सादर करण्यास चालढकल केल्याने उपअभियंता भरत गुंटुरकर यांनी संबंधित फॉर्म हाऊस मालकांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश सिंचन शाखा साळोख येथील दफ्तर कारकून म. वि. भुजबळ यांना दिले होते. पण शुक्रवारी सिंघम बनलेले गुंटुरकर सोमवार सांयकाळपर्यंत फुसका बार ठरल्याचे दिसून आले. त्यामुळे पाणी चोरीच्या या प्रकरणात नेमके पाणी कुठे मुरतंय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नेमके प्रकरण काय?
कर्जत तालुक्यातील गणेगांव चिंचवली गावाच्या हद्दीतील सर्व्हे नंबर ३७ ही वनविभागाची जागा असताना फार्म हाऊस मालक ललीतकुमार एस. कनोडीया व इतर फार्म हाऊस मालक उल्हास – पेजनदीमधून अवैधरित्या पाणी उपसा करीत आहेत. फार्म हाऊस मालकाने उपसा सिंचनास परवानगी मिळण्यासाठी उपविभागीय अभियंता पाटबंधारे विभाग कर्जत यांच्याकडे ९ एप्रिल २०२१ रोजी लेखी पत्राद्वारे परवानगी मागितली होती. याबाबत पाटबंधारे विभागाने या पत्राला २७ एप्रिल २०२१ ला लेखी स्वरुपात उत्तर देताना सांगितले की, आपण उल्हास – पेजनदीमधून आपली पाईपलाईन नदीपासून फॉर्म हाऊसपर्यंत कशी टाकणार, त्याबाबत नकाशावर रंगवून या कार्यालयास सादर करावे. तसेच ज्या जागेमधून पाईपलाईन जाणार आहे, त्या भूधारकांचा नाहरकत दाखला सोबत जोडण्यात यावा. जेणे करून आपणांस सिंचनाची परवानगी देणे शक्य होईल. मात्र, फॉर्म हाऊस मालकाने याबाबत कागदपत्रे सादर न करता अवैधरित्या पाणी उपसा सुरूच ठेवला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -