घररायगडकळंबोलीतील होल्डिंग पाँड प्रश्न न्यायालयात

कळंबोलीतील होल्डिंग पाँड प्रश्न न्यायालयात

Subscribe

महापालिकेला हवी स्वच्छतेसाठी परवानगी

पनवेल: कळंबोली वसाहतीमधील गाळाने भरलेल्या होल्डिंग पाँड तथा धारण तलावांमुळे वसाहतींना पुराच्या पाण्याचा धोका वाढल्याने त्यातील गाळ काढण्यास परवानगी मिळावी यासाठी पनवेल महापालिकेच्यावतीने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.समुद्रसपाटीपासून खाली असलेल्या कळंबोली वसाहतीत सिडकोच्यावतीने होल्डिंग पाँडची निर्मिती करण्यात आली आहे. पुराच्या पाण्यापासून वसाहतींचे संरक्षण व्हावे या हेतूने सिडकोने बांधलेले हे होल्डिंग पाँड सध्या गाळ आणि खारफुटीने भरलेले आहेत. गाळ आणि खारफुटीने भरल्यामुळे या ठिकाणी नेहमीच उग्र वास येत असतो.
धारण तलावात ८० टक्के गाळ असल्याने केवळ २० टक्केच पाणी साचू शकते. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने दरवर्षी पावसाळयात कळंबोली शहरात पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर या धारण तलावांची स्वच्छता व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे.शेकापचे माजी नगरसेवक रवींद्र भगत यांनीही या मागणीसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.मात्र धारण तलावात वाढलेल्या कांदळवाणामुळे गाळ काढतांना कांदळवनांना धोका पोहचण्याची शक्यता असल्याने या तलावाची स्वच्छता करण्यासाठी कांदळवन कक्षाच्या मान्यतेची गरज लागत आहे. सिडकोच्यावतीने यापूर्वी धारण तलावाच्या स्वच्छतेसाठी परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते.मात्र त्यात सिडकोला अपयश आले. कळंबोली येथील धारण तालावचे पनवेल पालिकेकडे हसतांतरण झालेले नाही मात्र वसाहतीला असलेला पुराचा धोका लक्षात घेत कळंबोली वसाहती मधील धारण तलावाच्या स्वच्छतेची परवानगी मिळवण्यासाठी पनवेल पालिकच्यावतीने प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच भाग म्हणून महापालिकेच्यावतीने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती पालिका बांधकाम विभागातील अधिकारी संजय कटेकर यांनी दिली आहे.

वसाहतीत पूराची शक्यता
मलनिस्सारण वाहिन्या आणि पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई कामांची जबाबदारी पालिकेने स्वीकारली आहे,कळंबोलीसाठी उभारण्यात आलेला होल्डिंग पाँड तथा धारण तलाव गाळाने भरल्याने वर्षभर पाण्याने भरलेला राहत असून, येथील पाण्याचा निचरा होण्यास अडथळे येत आहेत.पावसाळ्यात भरतीच्या वेळी खाडीचे पाणी होल्डिंग पाँडमध्ये शिरून सिवरेज लाईनद्वारे वसाहतीत पूर येण्याची शक्यता जास्त आहे.

- Advertisement -

धारण तलाव म्हणजे काय
मुसळधार पावसात भरतीच्या वेळेत पावसाचे पाणी शहरात साचू नये, यासाठी सिडकोने शहराची निर्मिती करताना खाडीकिनारी जागोजागी मोठे होल्डिंग पाँड तथा धारण तलाव उभारले. या तलावांची उभारणी करताना हॉलंड शहराचे नियोजन लक्षात घेण्यात आले. धारण तलावांना लागूनच मोठे फ्लॅप गेट बसविण्यात आले. त्यामुळे भरतीच्या वेळेत हे गेट आपोआप बंद होऊन खाडीचे पाणी शहरात शिरणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली. याशिवाय शहरातील पावसाचे पाणी धारण तलावांमध्ये साठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -