घररायगडआदिवासी भागातील रस्ते दुर्लक्षित

आदिवासी भागातील रस्ते दुर्लक्षित

Subscribe

कर्जत तालुक्यातील दुर्गम आदिवासी बहुल भागातील अंतर्गत रस्त्यांची अनेक वर्षांपासून दयनीय अवस्था झाली असून, वाड्यापाड्यांना जोडणार्‍या या रस्त्यांच्या दुरवस्थेकडे प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याने दळणवळणाअभावी आदिवासींच्या उपजीविकेवर गंडांतर आले आहे.

कर्जत तालुक्यातील दुर्गम आदिवासी बहुल भागातील अंतर्गत रस्त्यांची अनेक वर्षांपासून दयनीय अवस्था झाली असून, वाड्यापाड्यांना जोडणार्‍या या रस्त्यांच्या दुरवस्थेकडे प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याने दळणवळणाअभावी आदिवासींच्या उपजीविकेवर गंडांतर आले आहे. आदिवासी बांधव उपजीविकेसाठी शेतीमधील पिकाव्यतिरिक्त लागवड केलेला भाजीपाला, तसेच पावसाळी रानभाज्या जमा करून शहरातील बाजारात विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र खराब रस्त्यांमुळे कोणतेही वाहन वस्तीवर येत नसल्याने डोक्यावर ओझे घेऊनच त्यांना बाजार गाठावा लागतो. एखादी व्यक्ती आजारी झाल्यास त्याला दवाखान्यात नेण्यासाठी चादरीची डोली करून त्यातून मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागते. यामुळे हे आदिवासी मेटाकुटीला आलेले आहेत. अनेक रस्ते तर 20 वर्षांपासून जैसे थे अवस्थेत आहेत.

20 वर्षे झाली, वाडीचे रस्ते झाले नाहीत. खराब रस्त्यामुळे वाहने येत नाहीत. सरकारचे आदिवासी भागात लक्ष नाही. उन्हाळ्यात 2-4 किलोमीटर पायपीट करून पाणी आणावे लागते.
– महेंद्र कैवारी, ग्रामस्थ

- Advertisement -

वारे ग्रामपंचायत हद्दीतील जांभुळवाडी, हर्‍याची वाडी, नवसूची वाडी यांना जोडणार्‍या रस्त्यांची अवस्था बिकट आहे. तीव्र चढाव आणि उताराच्या या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यात काही महिन्यांपूर्वी वारे ग्रामपंचायतीने वारे-जांभुळवाडी रस्त्यावर मातीचा मुलामा चढवून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो उपायही कुचकामी ठरत आहे. रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य दिसून येत असून, त्याचा त्रास वाहनचालकांना होत आहे.

वाडीच्या रस्त्याची अवस्था बिकट आहे.अनेक वर्षांपासून काम झाले नसल्याने रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवासात त्रास होतो, वाहनांचाही खुळखुळा झाला आहे.
-प्रकाश हरिश्चंद्र शिंगवा, ग्रामस्थ

- Advertisement -

हेही वाचा –

मराठा आरक्षण टिकवता येत नाही म्हणून राज्य सरकारची धडपड, चंद्रकांत पाटील यांचा आरोप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -