ऐरोलीत शिंदे गटाचा जल्लोष; फटाके फोडून आंनदोत्सव साजरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्यातील शिवसेना पक्ष कुणाचा यावर काल निवडणूक आयोगाने निकाल दिला. पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण आणि नाव शिवसेना हे दोन्हीही शिंदे गटाला मिळाले असल्यामुळे शिंदे गटांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ऐरोली सेक्टर-८ येथील मध्यवर्ती कार्यालयाच्या आवारात एकच जल्लोष केला.

नवी मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्यातील शिवसेना पक्ष कुणाचा यावर काल निवडणूक आयोगाने निकाल दिला. पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण आणि नाव शिवसेना हे दोन्हीही शिंदे गटाला मिळाले असल्यामुळे शिंदे गटांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ऐरोली सेक्टर-८ येथील मध्यवर्ती कार्यालयाच्या आवारात एकच जल्लोष केला.
बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष विजय चौगुले यांच्या समवेत युवा नेते ममित चौगुले, युवानेते शुभम चौगुले, अ‍ॅड.रेवेंद्र पाटील, माजी नगरसेवक आकाश मढवी, रामआशिष यादव, राजू पाटील, नंदा काटे त्याच प्रमाणे महिला पदाधिकारी यांनी ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरवून शिवसेना नाव व चिन्ह मिळाल्याबद्ल आंनदोत्सव साजरा केला.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख चौगुले म्हणाले की, संघर्षातून उभे राहिलेले मुख्यमंत्री शिंदे यांना बाजूला सारण्याचा डाव काही जणांनी आखला होता. त्यामुळे भाजपा समवेत जाण्याची शिंदे यांनी योग्य भूमिका घेतली. न्यायालयाने दिलेला निर्णय हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे.या प्रसंगी पदाधिकार्‍यांनी आपण यापुढे मुख्यमंत्री शिंदे यांचे विचार जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली घराघरात पोहचविणार असल्याचे सांगत निर्णयाचे स्वागत केले.
====