घररायगडशिंदे गटाचे मंत्री सावंतांविरोधात ठाकरे गट आक्रमक

शिंदे गटाचे मंत्री सावंतांविरोधात ठाकरे गट आक्रमक

Subscribe

शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधत ’सध्या माझ्याकडे आरोग्य खाते आहे. माझ्याकडे सध्या चारच मेंटल हॉस्पिटल्स आहेत. या ठिकाणी कुठे जागा शिल्लक असेल तर त्याठिकाणी त्यांची नक्कीच नियुक्ती केली जाईल. ज्यांच्या मेंदूवर परिणाम झालेला असेल, त्यांना ताबडतोब वेड्यांच्या दवाखान्यात दाखल करावे, असा सल्ला मी आमच्या मुख्यमंत्र्यांना देणार आहे. अशा पद्धतीने आपण आदित्य ठाकरेंना वेड्याच्या रुग्णालयात दाखल करू.’ अशी टीका सावंत यांनी आदित्य ठाकरेंवर केल्यामुळे राज्यभर ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले असताना खालापूर तालुका आणि खोपोली शहरातील पदाधिर्‍यांनी शिळफाटा येथे आंदोलन करीत तानाजी सावंत यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजीही केली आहे.

खोपोली:  शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधत ’सध्या माझ्याकडे आरोग्य खाते आहे. माझ्याकडे सध्या चारच मेंटल हॉस्पिटल्स आहेत. या ठिकाणी कुठे जागा शिल्लक असेल तर त्याठिकाणी त्यांची नक्कीच नियुक्ती केली जाईल. ज्यांच्या मेंदूवर परिणाम झालेला असेल, त्यांना ताबडतोब वेड्यांच्या दवाखान्यात दाखल करावे, असा सल्ला मी आमच्या मुख्यमंत्र्यांना देणार आहे. अशा पEद्धतीने आपण आदित्य ठाकरेंना वेड्याच्या रुग्णालयात दाखल करू.’ अशी टीका सावंत यांनी आदित्य ठाकरेंवर केल्यामुळे राज्यभर ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले असताना खालापूर तालुका आणि खोपोली शहरातील पदाधिर्‍यांनी शिळफाटा येथे आंदोलन करीत तानाजी सावंत यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजीही केली आहे.
कट्टर शिवसैनिक संगम जाधव यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलनाच्या प्रारंभी शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.त्यानंतर खोपोली पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरिक्षक हरेश काळसेकर यांच्याकडे निवेदन देण्यात आले.यावेळी शिवसेना शहर प्रमुख डॉ. सुनील पाटील, संगम जाधव, प्रशांत खांडेकर,महेश पाटील,दिलीप पुरी, विलास चालके, प्रणाल लाले, रमजान शेख, मंगेश पाटील, दादा शेळके, योगेश बैलमारे, नासिर पठाण, शेखर धोत्रे, हमीद शेख, अर्जुन देशमुख, वासुदेव धामणसे, अभय घोसाळकर, विशाल म्हामूणकर, अंकुश नायर, सचिन पाटील, भास्कर रेकाळसे, महिला आघाडीच्या जैबुनिसा शेख, किशोरी शिगवण, भाग्यश्री चव्हाण, छाया सावंत, करुणा शेलार, गिता देशमुख, मिना दळवी, सुखदा बने , गुरव आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बेताल वक्तव्यांमुळे सरकार पडू शकते…
राज्याचा जबाबदार मंत्री असणारे तानाजी सावंत यांची जीभ घसरल्यामुळे आमच्या नेत्यावर टिका असतात हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणार आहे अशी टिका युवासेना तालुका अधिकारी महेश पाटील यांनी आंदोलनात बोलताना केली आहे. तर तानाजी सावंतसारख्या मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे सरकार पडू शकते अशी भविष्यवाणी कट्टर शिवसैनिक संगम जाधव यांनी केली आहे. तानाजी सावंत यांनी बेताल वक्तव्य करून असभ्य भाषेचा दर्शन घडविल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने करीत अशोभनीय वक्तव्य करणार्‍या मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची मागणी शिवसेना शहर प्रमुख डॉ.सुनील पाटील यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -