घररायगडउरणमधील हनुमान कोळीवाडावासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित; सफाई करून प्रशासनाचा निषेध

उरणमधील हनुमान कोळीवाडावासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित; सफाई करून प्रशासनाचा निषेध

Subscribe

जेएनपीटी विस्थापितांचे शासनाकडून गेली ३८ वर्षेपासून पुनर्वसन न झाल्याच्या निषेधार्थ हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी जुना शेवा कोळीवाडा गावात सफाई करून शासन चालढकलपणाचा निषेध केला. हा साफसफाईचा कार्यक्रम जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत सुरूच ठेवणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

उरण: जेएनपीटी विस्थापितांचे शासनाकडून गेली ३८ वर्षेपासून पुनर्वसन न झाल्याच्या निषेधार्थ हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी जुना शेवा कोळीवाडा गावात सफाई करून शासन चालढकलपणाचा निषेध केला. हा साफसफाईचा कार्यक्रम जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत सुरूच ठेवणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
हनुमान कोळीवाडा गावातील पारंपारीक मच्छिमारांना सर्वोच्च न्यायालयाने नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिल्यामुळे मच्छिमारांची आर्थिक परिस्थिती सुधारली असल्याने मूळ शेवा कोळीवाडा गावात ग्रामस्थ स्वखर्चाने हक्काची घरे बांधून कायमचे शेवा कोळीवाड्यात आज पासून राहणार आहेत, असे ग्रामस्थांनी सांगितले.यावेळी रमेश कोळी, सुरेश कोळी, परमानंद कोळी, नितीन कोळी, हरेश कोळी, मेघनाथ कोळी, मंगेश कोळी, नम्रता कोळी, दीप्ती कोळी, कल्याणी कोळी, ज्योती शेवेकर, उज्वला कोळी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
पोलीस प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी सकाळपासून शेवा कोळीवाडा गावच्या आजूबाजूच्या परिसरात बंदोबस्तासाठी होते. पाच उपनिरिक्षक,१२ एपीआय,१२५ पोलीस कर्मचारी पोलीस बंदोबस्त साठी असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांनी दिली. यावेळी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील, न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे आदी पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

सन १९८४ सालच्या सरकारी जनगणने नुसार शेवा कोळीवाडा गावातील ८६शेतकरी आणि १७० बिगर शेतकरी अशा एकूण २५६ कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचे जाहीर केले होते. त्यांचे बोरीपाखाडी उरण येथे १७ हेक्टर जमिनीत शासनाचे माप दंडानंदाने पुनर्वसन करण्याचे ८ ऑगस्ट १९८५ ला मंजूर करण्यात आले होते. पण जेएनपीटीने निधी न दिल्याने गेली ३७ वर्ष होऊनही ते पूर्ण झालेले नाही. त्यामुळे हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे.
– रमेश कोळी
ग्रामस्थ, हनुमान कोळीवाडा

- Advertisement -

जेएनपीटीने शेवा कोळीवाडा गावातील लोकांच्या जमिनी, साधन संपदा आणि घरे दारे घेऊनही शासनाच्या मापदंडानुसार जेएनपीटी प्रशासन पुनर्वसन करत नसल्याने आणि जेएनपीटीकडून होत असलेला मानवी हक्कांचा छळ असह्य झाल्याने हनुमान कोळीवाडा (शेवा कोळीवाडा) गावातील ग्रामस्थांनी माननीय लोकायुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या ११ जुलै २०१७ रोजीच्या आदेशानुसार ग्रामसभेत मूळ शेवा कोळीवाडा गावात कायमस्वरूपी रहायला जाण्याचा निर्णय घेऊन ठराव मंजूर केला आहे.
– सुरेश कोळी
ग्रामस्थ, हनुमान कोळीवाडा

जेएनपीए प्रशासनाने शेवा कोळीवाडा गावाचे पुनर्वसनाची खर्चाची हमीची लेखी जबाबदारी महाराष्ट्र शासनाला १२ नोव्हेंबर १९८२ रोजी दिली होती. ती गेली ३७ वर्षात कागदावरच आहे. त्यामुळे ग्रामस्थामध्ये संतापाचे वातावरण असून असंतोष खदखदत आहे याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी मूळ हनुमान कोळीवाडाच्या गावठाणाच्या जागेवर जाऊन घरांची उभारणी आणि गावाची साफ सफाई करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
– मंगेश कोळी
ग्रामस्थ, हनुमान कोळीवाडा

- Advertisement -

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समाजात शांतता अबाधित राहावी. कोणाचेही नुकसान होऊ नये,कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला आहे.
– धनाजी क्षीरसागर,
सहाय्यक पोलीस आयुक्त, न्हावा शेवा पोर्ट विभाग.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -