Eco friendly bappa Competition
घर रायगड  इलेक्ट्रिशियन कोर्सला महिलांचा उदंड प्रतिसाद; मुलींकडून स्वतःचे उद्योग सुरु

 इलेक्ट्रिशियन कोर्सला महिलांचा उदंड प्रतिसाद; मुलींकडून स्वतःचे उद्योग सुरु

Subscribe

ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणार्‍या मुंबई ऊर्जा मार्ग या संस्थेच्या वतीने तरुणांना उद्योगक्षम प्रशिक्षण देऊन आर्थिकदृष्ठ्या स्वावलंबी बनविण्याचा अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला आहे. ही संस्था उच्च दाबाच्या वीज वाहिन्या प्रस्थापित करण्याचे कार्य विविध राज्यात करत असते. सदरच्या संस्थेच्यावतीने विनामूल्य उद्योगक्षम प्रशिक्षण देण्याच्या तिसर्‍या बॅचला नुकताच प्रारंभ करण्यात आला.

पनवेल: ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणार्‍या मुंबई ऊर्जा मार्ग या संस्थेच्या वतीने तरुणांना उद्योगक्षम प्रशिक्षण देऊन आर्थिकदृष्ठ्या स्वावलंबी बनविण्याचा अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला आहे. ही संस्था उच्च दाबाच्या वीज वाहिन्या प्रस्थापित करण्याचे कार्य विविध राज्यात करत असते. सदरच्या संस्थेच्यावतीने विनामूल्य उद्योगक्षम प्रशिक्षण देण्याच्या तिसर्‍या बॅचला नुकताच प्रारंभ करण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील ढोक येथे इलेक्ट्रिशियन कोर्स शिकविणार्‍या तिसर्‍या बॅचला किशोरवयीन मुलींच्याकडून प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला.यापूर्वी दोन तुकड्यांना इलेक्ट्रिशियन कोर्सचे प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांना रोजगार मिळविण्यासाठी अथवा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी याचा फायदा होत आहे. अर्थातच यामुळे मुंबई आणि उपनगर तसेच मुंबई प्रदेशात ऊर्जा मार्ग यांच्या उपक्रमाची प्रशंसा होत आहे तसेच रोजगार आणि उद्योग मिळत असल्याने तरुण या प्रशिक्षणाला प्राधान्य देत आहेत.

तीन बॅचमधून ७८ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
मुंबई ऊर्जा मार्ग या संस्थेने आतापर्यंत ३ बॅचमधून ७८ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. यामधील बहुतांश मुलांना विविध कंपन्यांच्यात नोकर्‍या मिळाल्या आहेत.या उपक्रमाचे अंतर्गत मुंबई आणि उपनगर प्रदेशातील किमान २०० मुलांना प्रशिक्षित करण्याचा कंपनीचा मानस आहे. राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी या प्रशिक्षित मुलांचा नक्कीच हातभार लागेल यात जराही शंका नाही.

- Advertisement -

या प्रशिक्षणाबाबत मी खूप उत्साही आहे. यामध्ये मला पुस्तकी ज्ञानासोबत भरपूर प्रात्यक्षिक सुद्धा करायला मिळणार आहेत. मला खात्री आहे की, हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर मला आणि माझ्यासारख्या मुलींना रोजगाराच्या अनेक संधी प्राप्त होणार आहेत. या अभिनव उपक्रमाद्वारे मला प्रशिक्षित करणार्‍या मुंबई ऊर्जा मार्ग यांचे मी मनस्वी आभार मानते.या प्रशिक्षणामुळे आम्ही आत्मनिर्भर होणार आहोत याचा वेगळा आनंद आहेच.
– श्रुती विश्वनाथ साळुंखे,
तिसर्‍या बॅचची विद्यार्थिनी

कोट…
मी तंत्र कौशल्य क्षेत्राच्यात काहीतरी करू इच्छित होते तसेच नवीन संधीच्या शोधात होते. मुंबई ऊर्जा मार्गाच्या या अभियानामुळे मला दोन्ही गोष्टी मिळाल्या. मागच्या बॅचमधील मुलांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी मिळत आहेत ते पाहता मला खात्री आहे की या प्रशिक्षणपूर्ती नंतर मला सुद्धा निश्चितपणे स्वतःच्या पायावर उभे राहता येईल. मी आमच्या चेहर्‍यावर हास्य फुलविणार्‍या मुंबई ऊर्जा मार्ग यांच्या उपक्रमाचे मनःपूर्वक आभार मानते. मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्प अशाच प्रकारे अनेक सेवाभावी उपक्रम रायगड जिल्ह्यात राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
– निकिता योगेश भोईर,

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -