घरक्रीडाआंतरराष्ट्रीय स्किइंग चॅम्पियनशिपमध्ये आंचल ठाकुरची विक्रमी कामगिरी, कांस्य पदक पटकावत रचला इतिहास

आंतरराष्ट्रीय स्किइंग चॅम्पियनशिपमध्ये आंचल ठाकुरची विक्रमी कामगिरी, कांस्य पदक पटकावत रचला इतिहास

Subscribe

युरोपीय देश मॉन्टेनेग्रोमधील कोलासिन येथे झालेल्या स्किइंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय स्की ॲथलीट आंचल ठाकूरने इतिहास रचला आहे. एफआयएस अल्पाइन स्की स्पर्धेत तिने कांस्य पदक पटकावलं आहे. या व्यतिरिक्त भारतातील पहिली स्की ॲथलीट आंचल ठाकुरने आंतरराष्ट्रीय स्किइंग चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत दोन पदकं आपल्या नावावर मिळवली आहेत.

दोन कास्यं पदकं मिळवून देणारी पहिली महिला खेळाडू

मनालीच्या आंचल ठाकुरने २०१८ मध्ये तुर्कीतील स्किइंग आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पहिलं कांस्य पदक पटकावलं होतं. भारताला दोन कास्यं पदकं मिळवून देणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे.आंचल ठाकूरचे वडील रोशन ठाकूर यांनी सांगितले की, आंचलने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे आणि राज्याचे नाव मोठे केले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून आंचल ऑस्ट्रियामध्ये स्किइंगचे प्रशिक्षण घेत आहे. तिचा भाऊ हिमांशू ठाकूर हा देखील स्किइंगपटू आहे.

- Advertisement -

हे माझं दुसरं आंतरराष्ट्रीय पदक

या ऐतिहासिक विजयानंतर आंचलने सोशल मीडियावर एक ट्विट देखील केलं आहे. त्यामध्ये तिने लिहिलंय की, तीन वर्षानंतर मी पुन्हा एकदा करून दाखवलं आहे. हे माझ्या देशासाठी आहे. मला कठीण काळात पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानते. हे माझं दुसरं आंतरराष्ट्रीय पदक आहे. ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. त्यांचे मी आभार मानते, असे आंचल ठाकुरने ट्विटच्या माध्यमातून लिहिले आहे.

- Advertisement -

आंचल ठाकुरचा जन्म २८ ऑगस्ट १९९६ रोजी मनाली येथे झाला. मनालीतील आंचल ठाकुरने आंतरराष्ट्रीय स्किइंग स्पर्धेत कांस्य पदक पटकावत देशाचं आणि राज्याचं नावं मोठं केलं आहे, असे क्रीडा मंत्री राकेश पठानिया यांनी म्हटले आहे.


हेही वाचा : हरभजन सिंगचा क्रिकेट जगताला अलविदा, राजकीय इनिंग सुरू करण्याची शक्यता


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -