घरक्रीडाकर्णधार म्हणून धोनीनंतर 'हाच' भारी - सेहवाग

कर्णधार म्हणून धोनीनंतर ‘हाच’ भारी – सेहवाग

Subscribe

मुंबई इंडियन्सने बुधवारी झालेल्या कोलकाताविरुद्धच्या सामन्यात ४९ धावांनी पराभव करत विजयाचं खातं उघडलं. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच्या ८० धावांच्या दमदार खेळीमुळे मुंबईला कोलकातासमोर १९६ धावांचं लक्ष्य ठेवता आलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताचा डाव मुंबईच्या भेदक गोलंदाजांपुढे गडगडला. या समान्यात रोहितचं नेतृत्व कौशल्य पुन्हा एकदा पाहायला मिळालं. रोहितच्या नेतृत्वाचं भारताचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने कौतुक केलं आहे.

रोहित तडाखेबाज खेळीचं आणि नेतृत्वाचं विरेंद्र सेहवागने कौतुक केलं आहे. मी नेहमीच बोलत आलो आहे की महेंद्रसिंग धोनीनंतर रोहित शर्मा सर्वोत्तम कर्णधार आहे. सामना आणि एकंदरीत परिस्थिती समजून घेण्याची क्षमता उत्तम आहे. सामन्यातील परिस्थितीवरुन रोहित गोलंदाजीत आणि क्षेत्ररक्षणात बदल करतो, ते एक उत्तम कर्णधारच करु शकतो, अशा शब्दांत सेहवागने रोहित शर्माचं कौतुक केलं आहे.

- Advertisement -

कोलकाताविरुद्धच्या सामन्यात नितीश राणा आणि कार्तिक मैदानावर असताना रोहित ऐवजी दुसरा कोणी कर्णधार असता तर कृणाल पांड्याला गोलंदाजी दिली असती आणि हा निर्णय चूकिचा ठरला असता. मात्र, रोहितने त्यावेळी पोलार्डला गोलंदाजी दिली. पोलार्डने अनुभवाच्या जोरावर कोलकाताच्या धावगतीवर अंकुश ठेवला. रोहितने पोलार्डला खेळपट्टीवर स्थिर झालेल्या फलंदाजांसमोर गोलंदाजी दिली असती तर पोलार्डला फटके पडले असते. उजव्या हाताच्या फलंदाजांसमोर पोलार्ड अनेकदा महागडा ठरला आहे. परंतु रोहितने डावखुऱ्या नितीश राणासमोर गोलंदाजी दिली. पोलार्डने रोहितचा निर्णय योग्य ठरवला, असं विरेंद्र सेहवागने क्रिकबझशी बोलताना सांगितलं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -