घरक्रीडाक्रिकेटमध्ये घडला इतिहास! वन डेच्या एका इनिंगमध्ये ४८२ रन्स!

क्रिकेटमध्ये घडला इतिहास! वन डेच्या एका इनिंगमध्ये ४८२ रन्स!

Subscribe

पुरूषांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरूद्ध विक्रमी ४८२ धावा करत एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या धावसंख्येचा नवा विक्रम उभा केला आहे. ४८२ धावांचा पाठलाग करताना पाहुणा ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या २३९ धावांवर गारद झाल्याने इंग्लंडने २४२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. दरम्यान, ५ सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने ३ - ० अशी आघाडी घेतली आहे.

पुरूषांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरूद्ध विक्रमी ४८२ धावा करत एकदिवसीय क्रिकेट सामन्यात धावसंख्येचा नवा विक्रम उभा केला आहे. इंग्लंडमधील नॉटिंगहॅम मैदानावर या विक्रमाची नोंद झाली आहे. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेला पाहुणा ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या २३९ धावांवर गारद झाल्याने इंग्लंडने २४२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. तिसरा एकदिवसीय सामना जिंकत इंग्लंड संघाने ५ सामन्यांच्या मालिकेत ३ – ० अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंड विरूद्ध झालेल्या तिसऱ्या एकदिवशीय सामन्यातील हा पराभव ऑस्ट्रेलियाचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा पराभव आहे.

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई

मंगळवारी इंग्लंडच्या नॉटिंगहॅम मैदानावर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची जबरदस्त धुलाई केली. सलामीवीर जेसन रॉय (८२), जॉनी बेअरस्ट्रो (१३९), अॅलेक्स हेल्स (१४७) आणि कर्णधार इयॉन मॉर्गनच्या ६७ धावांच्या खेळीने ६ गडी गमावत इंग्लंडने तब्बल ४८१ धावांचा डोंगर उभारला. इंग्लंडच्या फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना नाकीनऊ आणले. वेगवेगळे प्रयोग करून देखील इंग्लंडच्या फलंदाजांना रोखणे ऑस्ट्रेलियाला काही जमले नाही. त्यानंतर ४८१ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा फलंदाजी अक्षरक्ष: ढेपाळली. सलामीवीर ट्रॅव्हिस हेड (५५) आणि मार्कस स्टॉइनिस (४४) वगळता ठराविक काळानंतर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज तंबूत परतले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला ३७ षटकांमध्ये ६ गड्यांच्या मोबदल्यात केवळ २३९ धावाच करता आल्या. इंग्लंडकडून गोलंदाजी करताना रशिदने ४ तर मोईन अलीने ३ गडी टिपले.

- Advertisement -

न्यूझीलंडच्या महिलांचा देखील विश्वविक्रम

न्युझीलंडच्या महिला संघाने देखील हम किसीसे कम नहीं हे याआधी दाखवून दिले आहे. डबलिन येथे आर्यलंड विरूद्धच्या वन डे सामन्यात देखील न्यूझीलंडच्या महिला संघाने तब्बल ४९५ इतकी विक्रमी धावसंख्या उभारली आहे. वन डे क्रिकेटमधील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. ४९५ धावांचा पाठलाग करताना आर्यंलंडचा महिला संघ १४४ धावांमध्ये गारद झाल्याने न्यूझीलंडच्या महिला संघाने ३४६ धावांनी विजय साकार केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -