घरक्रीडाAsian games 2018 : नेमबाजीत हिनाला कांस्यपदक

Asian games 2018 : नेमबाजीत हिनाला कांस्यपदक

Subscribe

२१९.२ स्कोअर करत तिने कांस्यपदक कमावले आहे. तर मनू भाकर याला या स्पर्धेत पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.

एशियन्स गेम्समध्ये पदक कमाई सत्र सुरुच आहे. १० मीटर एअर पिस्टल स्पर्धेत हिनाने कांस्यपदकाची कमाई केली आहे. २१९.२ स्कोअर करत तिने कांस्यपदक कमावले आहे. तर मनू भाकर याला या स्पर्धेत पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.

- Advertisement -

क्वॉलिफाईंग राऊंडमध्ये केली होती चांगली कामगिरी

हिना सिद्धू आणि मनू भाकर यांनी क्वॉलिफाईंग राऊंडमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यामुळेच या दोघी अंतिम सामन्यापर्यंत पोहोचल्या. हिना क्वॉलिफायिंग राऊंडमध्ये सातव्या क्रमांकावर होती तर मनू तिसऱ्या स्थानावर होती. हिनाचा क्वॉलिफायिंग राऊंडमध्ये ५७१ स्कोर होता. या गुणांच्या जोरावर दोघी अंतिम फेरीत पोहोचल्या. गीता सिद्धूने उत्तम कामगिरी करत कांस्यपदकावर समाधान मानले तर मनू पाचव्या क्रमांकावर गेली.

आतार्यंत २३ पदकं

आज एशियन गेम्सचा सहावा दिवस आहे. गुरुवारी दिवसाअखेरीस पदकांची संख्या १९ होती. आज पदकांची संख्या २३ वर गेली आहे. आतापर्यंत ६ सुवर्ण, ४ रौप्य आणि १३ कांस्यपदकाची कमाई केली आहे. पदकांच्या आकडेवारीसह आता भारत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -