घरक्रीडाAsian Games 2018: भारतीय महिला रिले संघांची सुवर्ण कामगिरी

Asian Games 2018: भारतीय महिला रिले संघांची सुवर्ण कामगिरी

Subscribe

भारतीय महिला रिले संघांने विक्रमी पाचव्या वेळेस ४०० मीटर शर्यतीत विजय मिळवत भारताला १३ वं सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

इंडोनेशियात सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताने आतापर्यंत उत्तम कामगिरी केली असून नुकतेच भारताने १३ वं सुवर्णपदक आपल्या नावे केलं आहे. भारताच्या महिला रिले संघाने ४x४०० मीटर शर्यतीत विजय मिळवला आहे. भारताच्या हिमा दास, सरिताबेन गायकवाड,विसमया आणि एम आर पुवम्मा या चौघींनी अवघ्या ३.२८.७२ इतक्या वेळेत शर्यत जिंकत विजय मिळवला आहे.

- Advertisement -

भारतीय महिला रिले संघाचा विक्रमी ५ वा विजय

भारतीय महिला रिले संघाने सलग पाचव्यांदा ४x४०० मीटर शर्यतीत विजय मिळवत भारताला स्पर्धेतील १३ वं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. याआधी भारताच्या महिला संघाने ४ वेळेस ४x४०० मीटर शर्यतीत विजय मिळवला होता. आपल्या या ५ व्या विजयाबरोबरच भारतीय महिना संघाने एका विक्रमाची देखील नोंद केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -