घरक्रीडाTokyo Paralympics: अवनी लखेराने नेमबाजीत उत्कृष्ट कामगिरीने रचला इतिहास; भारतासाठी जिंकले सुवर्णपदक

Tokyo Paralympics: अवनी लखेराने नेमबाजीत उत्कृष्ट कामगिरीने रचला इतिहास; भारतासाठी जिंकले सुवर्णपदक

Subscribe

टोकियो पॅरालिम्पिक गेम्समध्ये भारताच्या अवनी लखेराने नेमबाजीत आपली उत्कृष्ट कामगिरी केली. इतकेच नव्हे तर भारतासाठी सुवर्णपदक जिंकले अनोखा इतिहास देखील रचला. भारताच्या अवनी लखेरा हिनी सोमवारी टोकियो पॅरालिम्पिक गेम्स नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर रायफलच्या वर्ग SH1 ची अंतिम फेरी जिंकून सुवर्णपदक पटकावले. पॅरालिम्पिकच्या इतिहासात नेमबाजीतील भारतासाठी हे पहिले सुवर्णपदक आहे. १९ वर्षीय नेमबाज अवनीने २४९.६ स्कोर करून हे सुवर्ण पदक भारताच्या पारड्यात टाकले.

- Advertisement -

जयपूरच्या अवनीने क्वालिफिकेशन राउंडमध्ये २१ नेमबाजांमध्ये सातवे स्थान मिळवून या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तिने ६० सीरिजमध्ये सहा शॉट्सनंतर ६२१.७ धावा केल्या, जे पहिल्या आठ नेमबाजांमध्ये स्थान मिळवण्यासाठी पुरेसे होते. या भारतीय नेमबाज मुलीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत सातत्य राखले आणि सलग १० पेक्षा जास्त स्कोर केला. चीनच्या झांग कुईपिंग आणि युक्रेनच्या इरियाना शेतनिकने ६२६ स्कोरसह क्वालिफिकेशन रेकॉर्ड करत विक्रमासह पहिले दोन स्थान मिळवले.

- Advertisement -

रविवारी, भाविनाबेन पटेलने महिला एकेरी टेबल टेनिस स्पर्धेत क्लास ४ आणि निषाद कुमारने पुरुषांच्या T47 उंच उडी स्पर्धेत रौप्य पदके जिंकलेत. टेबल टेनिसपटू भाविना पटेलने दिवसाची सुरुवात रौप्यपदक जिंकत केली. तिच्या या कामगिरीतून प्रेरणा घेत उंच उडी क्रीडा प्रकारात निषाद कुमारने रौप्यपदक, तर थाळीफेकमध्ये विनोद कुमारने कांस्यपदक आपल्या नावे केले. भारताच्या निषाद कुमारने पुरुष उंच उडीच्या टी-४७ प्रकारात रौप्यपदक जिंकतानाच आशियाई विक्रमही प्रस्थापित केला. २१ वर्षीय निषादने २.०६ मीटरची उंची पार केली. अमेरिकेच्या डॅलास वाईसनेही २.०६ मीटरची उंची पार केल्याने त्याने आणि निषादने रौप्यपदकाची कमाई केली. या स्पर्धेत अमेरिकेच्या रॉड्रिक टाऊन्सएन्डने २.१५ मीटर इतकी उंच उडी मारत जागतिक विक्रमासह सुवर्णपदक पटकावले.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -