घरक्रीडाराष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पी. व्ही. सिंधूला दुसऱ्यांदा ध्वजवाहकाचा मान

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पी. व्ही. सिंधूला दुसऱ्यांदा ध्वजवाहकाचा मान

Subscribe

ब्रिटनमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पी. व्ही. सिंधूला ध्वजवाहकाचा मान मिळाला आहे. यंदा सुरु होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी ध्वजवाहकाचा मान हा नीरज चोप्राला देण्यात आला होता.

ब्रिटनमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पी. व्ही. सिंधूला ध्वजवाहकाचा मान मिळाला आहे. यंदा सुरु होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी ध्वजवाहकाचा मान हा नीरज चोप्राला देण्यात आला होता. पण नीरजला दुखापत झाल्यामुळे तो या स्पर्धेत खेळणार नाही. त्यामुळे यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पी. व्ही. सिंधूला हा मान मिळाला आहे.

पी. व्ही. सिंधूला दुसऱ्यांदा ध्वजवाहकाचा मान मिळाला आहे. याआधी २०१८ साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी तिला हा सन्मान देण्यात आला होता. सिंधू ही जागतिक स्तरावर भारताची सर्वात यशस्वी बॅडमिंटन खेळाडू ठरली आहे. दोन ऑलिम्पिक पदकांबरोबरच तिच्या नावावर मानाच्या स्पर्धेतील जेतेपदं आहेत.

- Advertisement -

नीरज चोप्रा या स्पर्धेत खेळू शकणार नसल्यामुळे आता हा मान सिंधूला मिळणार आहे. त्यामुळे स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात सिंधू भारताचा तिरंगा घेऊन मैदानात उतरणार आहे. सिंधूने काही दिवसांपूर्वी सिंगापूर बॅडमिंटन स्पर्धा जिंकली होती.

कॉमनवेल्थ गेम्स २०२२ स्पर्धेला गुरूवार २८ जुलैपासून सुरवात होणार आहे. इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे ही स्पर्ध खेळवली जाणार आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय संघ आधीच बर्मिंगहॅमला पोहोचला आहे. परंतु, यंदा अनेक स्टार खेळाडू या स्पर्धेला मुकणार आहेत. त्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

त्यानुसार, स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा, विश्वविजेती मेरी कोम आणि सायना नेहवाल यांच्यासह अनेक स्टार खेळाडू यावेळी राष्ट्रकुलमध्ये आपली चमकदार कामिगीरी दाखवताना दिसणार नाहीत. हे सर्व खेळाडू वेगवेगळ्या कारणांमुळे बाहेर पडले आहेत.


हेही वाचा – कॉमनवेल्थ गेम्स २०२२ स्पर्धेला ‘हे’ स्टार भारतीय खेळाडू मुकणार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -