बांगलादेशच्या शकीब अल हसनची ऐतिहासिक कामगिरी; वनडेत नोंदवला ‘हा’ विक्रम

बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन याने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात इतिहास रचला आहे. शाकिब अल हसन वनडे क्रिकेटमध्ये 300 बळी घेणारा बांगलादेशचा पहिला गोलंदाज ठरला. चितगाव येथे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात रेहान अहमदची विकेट घेत त्याने ही ऐतिहासिक कामगिरी केली.

बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन याने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात इतिहास रचला आहे. शाकिब अल हसन वनडे क्रिकेटमध्ये 300 बळी घेणारा बांगलादेशचा पहिला गोलंदाज ठरला. चितगाव येथे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात रेहान अहमदची विकेट घेत त्याने ही ऐतिहासिक कामगिरी केली. शिवाय वनडे क्रिकेटमध्ये 6000 हून अधिक धावा आणि 300 हून अधिक विकेट घेणारा शाकिब तिसरा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी हा पराक्रम सनथ जयसूर्या आणि शाहिद आफ्रिदीने केला होता. डॅनियल व्हिटोरी आणि जयसूर्या यांच्यानंतर ही कामगिरी करणारा शाकिब तिसरा डावखुरा फिरकी गोलंदाज ठरला. (bouncer shakib al hasan world record created history take 300 odi wickets became first Bangladeshi player)

झिम्बाब्वेविरुद्ध पहिली विकेट

2006 मध्ये शाकिब याला झिम्बाब्वे विरुद्ध एल्टन चिगुम्बुराच्या रूपात पहिली वनडे विकेट मिळाली होती. 2010 मध्ये आशिया चषकादरम्यान असद शफिक हा शाकिबचा वनडेतील 100 वी विकेट ठरली होती. तसेच, 2015 मध्ये शाकीबने हाशिम आमला याला बाद करत 200वी विकेट मिळवली होती. त्यानंतर 2021 मध्ये शाकिब हा बांगलादेशसाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला. त्याने मश्रफी मोर्तझाला (269) मागे टाकताच त्याने 270 वी विकेट घेतली.

वनडेत जास्त विकेट घेणारा सहावा गोलंदाज

विशेष म्हणजे, शाकीब हा बांगलादेशचा कसोटी आणि T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अनुक्रमे 231 आणि 128 सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. वनडेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या फिरकी गोलंदाजांमध्ये शाकिब सहाव्या स्थानावर आला आहे. त्याच्या पुढे मुथय्या मुरलीधरन (534), आफ्रिदी (395), अनिल कुंबळे (337), जयसूर्या (323) आणि डॅनियल व्हिटोरी (305) आहेत.

शाकिबच्या नावावर हा अनोखा विक्रम

गेल्या वर्षी भारतीय संघाविरुद्धच्या होम वनडे मालिकेदरम्यान शाकिब घरच्या मैदानावर 3000 धावा आणि 150 विकेट्स पूर्ण करणारा पहिला अष्टपैलू खेळाडू बनला होता. या विक्रमाच्या बाबतीत जयसूर्याने शाकिबला मागे टाकले आहे. जयसूर्याने होम पिचवर वनडेमध्ये 3880 धावा केल्या होत्या आणि 119 विकेट्सही घेतल्या होत्या. सध्या त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.


हेही वाचा – महिला प्रीमियर लीगच्या पहिल्याच हंगामात आरसीबीच्या नावे विक्रम, पण…