घरताज्या घडामोडीपाकिस्तानात होळी खेळण्यापासून हिंदू विद्यार्थ्यांना रोखले; मारहाणीत 15 जखमी

पाकिस्तानात होळी खेळण्यापासून हिंदू विद्यार्थ्यांना रोखले; मारहाणीत 15 जखमी

Subscribe

पाकिस्तानातील लाहोर येथील पंजाब विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये अल्पसंख्याक हिंदूंना जबरदस्तीने होळी खेळण्यापासून रोखण्यात आले असून, त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. इस्लामिक विद्यार्थी संघटनेने हिंदू विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याची माहिती मिळते.

पाकिस्तानातील लाहोर येथील पंजाब विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये अल्पसंख्याक हिंदूंना जबरदस्तीने होळी खेळण्यापासून रोखण्यात आले असून, त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. इस्लामिक विद्यार्थी संघटनेने हिंदू विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याची माहिती मिळते. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याचे समजते. पंजाब विद्यापीठाच्या कॉलेजमध्ये सोमवारी सुमारे ३० हिंदू विद्यार्थी होळी खेळण्यासाठी जमले होते. (pakistan hindu students stopped from playing holi in pakistan 15 injured police did not register fir)

विद्यापीठातील विद्यार्थी आणि प्रत्यक्षदर्शी काशिफ ब्रोही यांनी दिलेल्या माहितीनुसार, एलए कॉलेजच्या लॉनमध्ये जेव्हा विद्यार्थी होळी खेळण्यासाठी जमले होते, तेव्हा इस्लामी जमियत तुलबाच्या (आयजेटी) विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. हिंदू विद्यार्थ्यांना होळी खेळण्यापासून रोखण्यासाठी मुस्लिम विद्यार्थ्यांनी बेदम मारहाण केली. मारहाण होत असल्याची समजताच सुरक्षा रक्षकांनी सर्वांना विद्यापीठ कॅम्पसच्याबाहेर फेकले. ब्रोही यांनी दावा केला की हिंदू विद्यार्थ्यांनीही होळी खेळण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून परवानगी घेतली होती.

- Advertisement -

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या खेत कुमार या हिंदू विद्यार्थ्याने सांगितले की, इस्लामी जमियत तुलबाच्या सदस्यांनी केलेल्या हल्ल्याची तक्रार करण्यासाठी कुलगुरूंच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करत असताना विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना मारहाण करून पळवून लावले. त्यांनी सांगितले की त्यांनी पोलिसांकडे IJT ची तक्रार नोंदवण्याची विनंती केली पण त्यांनी कोणतीही FIR नोंदवली नाही.

आयजेटीचे (पंजाब विद्यापीठ) प्रवक्ते इब्राहिम शाहीद यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, आयजेटीमधील कोणीही हिंदू विद्यार्थ्यांशी भांडण करत नाही. तसेच, आयजेटीने एलए कॉलेजमध्ये कुराण वाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

- Advertisement -

दुसरीकडे पंजाब विद्यापीठाचे प्रवक्ते खुर्रम शहजाद म्हणाले की, विद्यापीठ प्रशासनाने एलए कॉलेजच्या लॉनमध्ये होळी खेळण्याची परवानगी दिली नव्हती. हा कार्यक्रम सीमाभिंतीच्या आत आयोजित केला असता तर काही अडचण आली नसती. कुलगुरूंनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्याचा दावा त्यांनी केला.


हेही वाचा – गुजरात एटीएसची मोठी कारवाई, अरबी समुद्रात 425 कोटींचे ड्रग्ज जप्त, ५ गजाआड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -