घरक्रीडाआयपीएल ‘प्ले-ऑफ’ सामन्यांच्या वेळेत बदल

आयपीएल ‘प्ले-ऑफ’ सामन्यांच्या वेळेत बदल

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) प्ले-ऑफ आणि अंतिम सामन्याच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी घेतला. याआधी हे सामने रात्री ८ वाजता होणार होते. मात्र, आता हे सामने अर्धा तास आधी म्हणजेच रात्री ७:३० वाजता सुरू होणार आहेत. नुकतीच बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीची नवी दिल्लीमध्ये बैठक झाली. यामध्ये या विषयावरही चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ‘वुमन्स टी-२० चॅलेंज’ या महिलांच्या लीगचे ३ पैकी दोन सामने ७:३० वाजता सुरू होणार आहेत.

आयपीएलचे प्ले-ऑफमधील सामने पुढील आठवड्यात होणार आहेत. यापैकी पात्रता फेरी १ चा सामना हा चेन्नईला ७ मे रोजी खेळवण्यात येईल, तर बाद फेरीचा सामना ८ मे रोजी आणि पात्रता फेरी २ चा सामना १० मे रोजी विशाखापट्टणम येथे होईल. तसेच या स्पर्धेचा अंतिम सामना १२ मे रोजी हैद्राबाद येथे होणार आहे. हे सर्व सामने ७:३० वाजताच सुरू होणार आहेत.

- Advertisement -

पहिल्यांदाच होणार्‍या ‘वुमन्स टी-२० चॅलेंज’ या स्पर्धेत तीन संघांचा समावेश असून, या स्पर्धेचे तीनही सामने जयपूर येथे होणार आहेत. यातील पहिला सामना हा ६ मे रोजी होणार असून, या सामन्याला ७:३० वाजताच सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील दुसरा सामना ८ मे रोजी होणार आहे. मात्र, याच दिवशी आयपीएलचा बाद फेरीचा सामना होणार असल्याने हा सामना दुपारी ३:३० वाजता सुरू होईल. ९ मे रोजी होणारा या स्पर्धेचा तिसरा सामना पुन्हा ७:३० वाजताच सुरू होईल. या स्पर्धेचा अंतिम सामना ११ मे ला होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -