घरक्रीडालिव्हरपूलवर मात करत चेल्सी उपांत्यपूर्व फेरीत

लिव्हरपूलवर मात करत चेल्सी उपांत्यपूर्व फेरीत

Subscribe

एफ ए कप

मागील आठवड्यापर्यंत लिव्हरपूलला पराभूत करणे फारशा संघांना जमले नव्हते. मात्र, त्यांना एकाच आठवड्यात दोन पराभवांना सामोरे जावे लागले. मागील शनिवारी झालेल्या प्रीमियर लीगच्या सामन्यात त्यांना वॉटफर्डने ०-३ असे पराभूत केले होते. त्यामुळे त्यांची प्रीमियर लीगमधील सलग ४४ सामने अपराजित राहण्याची मालिका खंडित झाली होती. आता मंगळवारी एफ ए कपमध्येही लिव्हरपूलला पराभवाचा सामना करावा लागला. विलियन आणि रॉस बार्कलीच्या गोलमुळे चेल्सीने लिव्हरपूलवर २-० अशी मात करत एफ ए कपच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

या सामन्याच्या सुरुवातीपासूनच चेल्सीने आक्रमक खेळ केला. १२ व्या मिनिटाला विलियनला गोल करण्याची संधी मिळाली, पण त्याने मारलेला फटका लिव्हरपूलचा गोलरक्षक आद्रियानने अप्रतिमरीत्या अडवला. पुढच्याच मिनिटाला विलियनला आणखी एक संधी मिळाली. यावेळी मात्र त्याने मारलेला फटका आद्रियानला अडवता आला नाही. त्याच्या चुकीमुळे चेल्सीने सामन्यात १-० अशी आघाडी मिळवली. यानंतर लिव्हरपूलने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, २२ व्या मिनिटाला चेल्सीचा गोलरक्षक केपाने ३ फटके उत्कृष्टरीत्या अडवले. त्यामुळे चेल्सी आपली आघाडी मध्यंतरापर्यंत कायम राखली.

- Advertisement -

उत्तरार्धातही दोन्ही संघांनी चांगला खेळ सुरु ठेवला. ६३ व्या मिनिटाला चेल्सीच्या मेसन माऊंटने मारलेली फ्री-किक गोलपोस्टला लागली. मात्र, पुढच्याच मिनिटाला रॉस बार्कलीने गोल करत चेल्सीला २-० अशी आघाडी मिळवून दिली. पुढे चेल्सीच्या पेड्रो आणि ऑलिव्हीएर जिरुडला गोल करण्याच्या संधी मिळाल्या. मात्र, त्यांना याचा फायदा घेण्यात अपयश आले. परंतु, लिव्हरपूललाही गोल करता न आल्याने चेल्सीने हा सामना २-० असा जिंकत स्पर्धेत आगेकूच केली.

अल्मिरोनचे दोन गोल, न्यूकॅसलचा विजय

- Advertisement -

मिग्वाईल अल्मिरोनच्या दोन गोलच्या जोरावर न्यूकॅसल युनायटेडने एफ ए कपच्या पाचव्या फेरीतील सामन्यात वेस्ट ब्रॉमवर ३-२ असा विजय मिळवला. अल्मिरोन आपले दोन्ही गोल पूर्वार्धातच केले. तर उत्तरार्धाच्या सुरुवातीला लाझारोने गोल करत न्यूकॅसलला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर मॅट फिलिप्स आणि केनिथ झोहोरेच्या गोलमुळे वेस्ट ब्रॉमने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात त्यांना अपयश आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -