घरक्रीडासंपूर्ण तयारी, विमानाचं तिकीटही बुक, पण त्या फोनने फिरवलं पाणी; गोलंदाज सिमरजीत...

संपूर्ण तयारी, विमानाचं तिकीटही बुक, पण त्या फोनने फिरवलं पाणी; गोलंदाज सिमरजीत सिंहने सांगितला ‘तो’ किस्सा

Subscribe

इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) 15 व्या पर्वात अनेक बदल झाले आहेत. नियमांपासून ते अगदी खेळाडूंपर्यंत बदल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या पर्वात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाच्या ताफ्यात बदल झाल्याचे पाहायला मिळाले.

इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) 15 व्या पर्वात अनेक बदल झाले आहेत. नियमांपासून ते अगदी खेळाडूंपर्यंत बदल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या पर्वात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाच्या ताफ्यात बदल झाल्याचे पाहायला मिळाले. दोन नवे वेगवान गोलंदाज चेन्नईच्या संघातून गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. मुकेश चौधरी आणि सिमरजीत सिंह अशी या दोन्ही खेळाडूंची नाव असून, त्यांनी यंदाच्या आयपीएलच्या पर्वात चेन्नईसाठी उत्तम गोलंदाजी केली. मात्र आता उत्तम गोलंदाजीमुळे चर्चेत असलेला सिमरजीत सिंह याला काही काळापूर्वी तो नैराश्यात गेला होता. एका घटनेमुळे त्याचा आत्मविश्वास हरवला होता. या घटनेचा त्यानी खुलासा केला आहे.

चेन्नई सुपर किंग्जच्या एका व्हिडीओमध्ये गोलंदाज सिमरजीतने त्याच्यासोबत घडलेल्या प्रसंगाचा खुलासा केला आहे. यावेळी त्याने “माझी भारतीय संघात निवड झाली होती. मला अंडर 19 आशिया चषकासाठी भारतीय संघात निवडले होते. मला ज्यादिवशी विमानाने जायचे होते. त्याआधी काही तासांपूर्वी मला फोन आला. तुम्ही याआधीही आशिया चषकात खेळलात. त्यामुळे तुम्हाला आता खेळता येणार नाही. सकाळी सात वाजता माझे विमान होते. पण रात्री मला 11 वाजता फोन आला आणि तू संघाचा भाग नसल्याचे सांगितले. या प्रकारानंतर मला खूप वाईट वाटले. पण त्यावेळी माझ्या आई वडिलांनी मला हिंमत दिली. त्यामुळेच मी स्वत:ला सावरु शकलो. आई वडिल मला म्हणाले की, तू आता जिथे आहे, गर्व करायला हवा. त्यानंतर माझा आत्मविश्वास परतला. पुढील दौऱ्यासाठी माझी निवड झाली.”, असं सांगितलं

- Advertisement -

सिमरजीत सिंहने चेन्नई सुपर किंग्सच्या संघातून सनराइजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात आयपीएलमध्ये पदार्पण केले. या सामन्यात त्याने चार षटकात 27 धावांच्या मोबद्लयात दोन विकेट घेतल्या. चेन्नईने सिमरजीतला 20 लाख रुपयांमध्ये आपल्या संघात घेतले. याआधी 2021 मध्ये सिमरजीत मुंबई इंडियन्स संघाचा सहभाग होता. मुंबईकडून त्याला पदार्पणाची संधी मिळाली नव्हती. गोलंदाज सिमरजीत सिंह अंडर हा 19 संघाचा भाग राहिलाय. स्थानिक क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळतो आहे.


हेही वाचा – IPL 2022 : आयपीएलच्या गुणतालिकेत गुजरात टॉपवर; मुंबई, चेन्नई आऊट

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -