आमच्या कोइंबतूर मध्ये हिंदी बोलणारे पाणी पुरी विकतात… शिक्षणमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

Controversial statement of Tamil Nadu Education Minister about Hindi language
Controversial statement of Tamil Nadu Education Minister about Hindi language

तमिळनाडूचे उच्च शिक्षण मंत्री डॉ . के. पोनमुडी यांनी हिंदी भाषेबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले हिंदी भाषे पेक्षा इंग्रजी भाषा जास्त महत्वाची आहे. जे लोक हिंदी बोलतात ते लहान- मोठी कामे कसत असून हिंदी बोलनारे कोईबंतूरमध्ये पाणीपुरी विकत आहेत.

पोनमुडी यांनी हे वादग्रस्त विधान भारथिअर विद्यापीठाच्या दीक्षांत कार्यक्रमात केले. यावेळी हिंदी ही एक ऑप्शनल भाषा असली पाहीजे, ती सक्तीची असू नये, असे ते म्हणाले. यावेळी त्यानी राष्ट्रीय शिक्षण कायदा लागू करण्याचा दावा केला. मात्र, राज्य सरकार फक्त दोन भाषा व्यावस्था लागू करू इच्छित आहे, असे ते म्हणाले.

त्यांनी तमिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी यांच्या उपस्थितीत इंग्रजीसारखी आंतरराष्ट्रीय भाषा राज्यात शिकवली जात असताना हिंदी का शिकावी असा प्रश्न त्यांनी अपस्थित केला. तमिळ बोलणारे विद्यार्थी कोणत्याही भाषा शिकू इच्छित आहेत. मात्र, हिंदी भाषा सक्तीची नकरता ऑप्शनल असली पाहीजे.

तमिळनाडू भारतात शिक्षण व्यवस्थेत सर्वात पुढे आहे. इंग्रजी हिंदी पेक्षा जास्त महत्वाचीअसून हिंदी बोलणारे फक्त नोकरी करत आहेत, असा टोला पोनमुडी यांनी लगावला आहे. ते पुढे म्हणाले जर तुम्ही हिंदी शिकला तर तुम्हाला नोकरी मिळेल असे सांगितले जात होते. पण आपण कोईबंतूरमध्ये पाहू शकता की पाणीपुरी कोण विकत आहे?. या सर्व जुन्या गोष्टी आहेत. आता इंग्रजी आतरराष्ट्रीय भाषा आहे, असे तमिळनाडूचे उच्च शिक्षण मंत्री डॉ . के. पोनमुडी म्हणाले.