घरक्रीडाचेन्नईच ठरली सुपर 'किंग'

चेन्नईच ठरली सुपर ‘किंग’

Subscribe

रविवारचा दिवस आयपीएलच्या चाहत्यांसाठी खास ठरला. विशेष करुन धोनी आणि चेन्नई सुपर किंग्जच्या फॅन्ससाठी. कारण आयपीएलच्या यंदाच्या सीझनच्या ट्रॉफीवर पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जनं आपलं नाव कोरलं आहे. IPL2018च्या हैदराबाद विरुद्ध चेन्नई अशा रंगलेल्या अंतिम सामन्यात चैन्नईने ‘#whistlepodu’नं विजय साजरा केला आहे.

वॉटसनने ‘धो’ डाला
क्रिकेटप्रेमींसाठी आयपीएल ही पर्वणीच असते. यंदाचा आयपीएलचा ११ वा सीझनही शेवटपर्यंत चुरशीचा ठरला. रविवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जचा सामना मुंबईतल्या वानखेडे स्टेडिअमवर रंगला. चेन्नईने नाणेफेक जिंकून हैदराबादला बॅटिंगची संधी दिली. हैदराबादच्या टीमने २० षटकांत १७९ धावांचं आव्हान चेन्नईला दिलं होतं. शेन वॉटसनच्या शतकी खेळीमुळे चेन्नईनं धावांचं आव्हान सहज पार केलं. शेन वॉटसनने ५७ चेंडूत ११७ धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे विजयाचं पारडं चेन्नईकडे झुकलं होतं. वॉटसनच्या धावांच्या जोरावर चेन्नईने अंतिम फेरीत हैदराबादवर आठ विकेट्स राखून विजय मिळवला.

- Advertisement -

जल्लोषात विजय साजरा

- Advertisement -

चेन्नईचं हे आयपीएलमधलं तिसरं जेतेपद ठरलं. यापूर्वी २०१० आणि २०११ साली चेन्नईने आयपीएलचं जेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे विजयाचा आनंद या संघाने जल्लोषात साजरा केला. बघुयात कशी साजरी केली त्यांनी ही ‘विनिंग मोमेंट’…

 

तुम्हाला हे माहीत आहे का?

⦁ आतापर्यंत कोणत्याही टीमने दुसऱ्या टीमला एकाच सीजनमध्ये ४ वेळा पराभूत केलं नव्हतं. पण यंदा चेन्नई सुपरकिंग्जने हैदराबादवर ४ वेळा मात केली आहे. साखळी फेरीत दोनदा, क्वालिफायर सामन्यात एकदा आणि अंतिम फेरीत चेन्नईने हैदराबादला पराभूत केलं

⦁ आयपीएलच्या फायनल्समध्ये शतक झळकावणारा शेट वॉटसन हा पहिलाच परदेशी खेळाडू ठरला आहे. २०१४ साली वृद्धिमान साहाने आयपीएलच्या अंतिम फेरीत शतक झळकावलं होतं. मात्र या मॅचमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबला पराभूत व्हावं लागलं होतं.

⦁ चेन्नई सुपररकिंग्जने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला असून त्यांनी आता आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससोबत बरोबरी केली आहे.

⦁ रोहित शर्माने आतापर्यंत ४ आयपीएल सीजनमध्ये विजेतेपदाची चव चाखली आहे. यात तिनदा मुंबई इंडियन्सकडून तर एकदा डेक्कन चार्जर्सच्या टीमकडून खेळताना ही विजेतेपदं त्यानं पटकावली आहेत.

⦁ सुरेश रैनाने आतापर्यंत ३ वेळा चेन्नई सुपरकिंग्जकडून आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. तर धोनीने ४ वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -