घरक्रीडाCWG 2022 : 9 व्या दिवशी भारतावर पदकांचा पाऊस; 4 सुवर्णपदकांसह 14...

CWG 2022 : 9 व्या दिवशी भारतावर पदकांचा पाऊस; 4 सुवर्णपदकांसह 14 पदकांची कमाई, पाहा विजेत्यांची लिस्ट

Subscribe

बर्मिंगहॅममध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये 9 व्या दिवशी भारतावर पदकांचा वर्षाव सुरु आहे. या एकाच दिवसात भारतीय खेळाडूंनी 4 सुवर्ण पदाकांसह एकूण 14 पदके जिंकली आहे. यासह भारताच्या एकूण पदकांची संख्या 40 वर पोहोचली आहे. त्यापैकी 13 सुवर्ण पदक आहेत. या पदांसह भारत सध्या पाचव्या स्थानी आहे. 9 व्या दिवशी भारतासाठी पदक विजेते कोण होते? वाचा विजेत्यांची लिस्ट…

१) प्रियांका गोस्वामी ( रौप्य पदक)

- Advertisement -

भारताच्या प्रियांका गोस्वामी हिने महिलांच्या 10,000 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकले. तिने वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करताना 43 मिनिटे 38.83 सेकंद अशी वेळ नोंदवली.

२) अविनाश मुकुंद साबळे (रौप्य पदक)

- Advertisement -

पुरुषांच्या 3000 स्टीपलचेसमध्ये भारताच्या अविनाश मुकुंद साबळेने 8 मिनिटे 11.20 सेकंदात वैयक्तिकरित्या सर्वोत्तम कामगिरी करत रौप्य पदक पटकावले.


३) पुरुष फोर्स टीम (रौप्य पदक)

लॉन बॉल्सच्या पुरुष फोर्स टीमने अंतिम फेरीत भारतीय संघाला उत्तर आयर्लंडकडून 5-18 असा पराभव पत्करावा लागला आणि त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. मात्र कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासातील लॉन बॉलमध्ये पुरुषांचे हे पहिले पदक आहे.

४) जास्मिन (कांस्य पदक)

महिलांच्या लाइटवेट (57-60 किलो) बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय बॉक्सर जस्मिनला इंग्लंडच्या जेमा पेज रिचर्डसनकडून 2-3 असा पराभव पत्करावा लागला आणि कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

५) पूजा गेहलोत (कांस्यपदक)

कुस्तीमध्ये पूजा महिलांच्या 50 किलो गटात अंतिम फेरीत प्रवेश करू शकली नाही, परंतु तिने कांस्यपदकाच्या लढतीत स्कॉटलंडच्या क्रिस्टेल एलचा एकतर्फी पराभव केला. त्याने 12-2 अशा फरकाने विजय मिळवत कांस्यपदक जिंकले.

६) रवी कुमार दहिया (सुवर्ण पदक)

टोकियो ऑलिम्पिक रौप्य पदक विजेता रवी कुमार दहिया याने पुरुषांच्या 57 किलो वजनी गटातील कुस्तीमध्ये सुवर्ण पदक जिंकले. त्याने नायजेरियाच्या अबिकवेनिमो वेल्सेनचा 10-0 असा पराभव केला.

७) विनेश फोगट (सुवर्ण पदक)

कुस्तीमध्ये महिलांच्या 53 किलो गटातील चॅम्पियन विनेश फोगटने अवघ्या काही सेकंदात श्रीलंकेच्या चामोदिया केशानीला हरवून भारतासाठी सुवर्ण पदकाची दमदार कामगिरी केली.

८) नवीन कुमार (सुवर्ण पदक)

कुस्तीपटू नवीन कुमारनेही भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. त्याने कुस्तीतील पुरुषांच्या 74 किलो वजनी गटात पाकिस्तानच्या मोहम्मद शरीफ ताहिरचा 9-0 असा पराभव केला.

९) पूजा सिहाग (कांस्य पदक)

पूजा सिहागने कुस्तीमध्ये महिलांच्या 76 किलो गटात कांस्यपदक जिंकले. तिला अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही पण सुवर्णपदकाच्या लढतीत तिने ऑस्ट्रेलियाच्या नाओमी डी ब्रुइनचा 11-0 असा पराभव करून कांस्यपदक जिंकले.

१०) मोहम्मद हुसामुद्दीन (कांस्य पदक)

भारतीय बॉक्सर हुसामुद्दीनने पुरुष बॉक्सिंगच्या 57 किलो गटात कांस्यपदक मिळवले. उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला.

११) दीपक नेहरा (कांस्य पदक)

पुरुषांच्या कुस्तीच्या 97 किलो वजनी गटात भारतीय कुस्तीपटू दीपक नेहराने पाकिस्तानच्या तैयब राजाला 10-2 ने पराभूत करून कांस्यपदक जिंकले.

१२) सोनाबेन पटेल (कांस्य पदक)

34 वर्षीय सोनाबेनने पॅरा टेबल टेनिसच्या महिला एकेरीत कांस्यपदक जिंकले. तिने इंग्लंडच्या स्यू बेलीचा 11-5, 11-2, 11-3 असा पराभव केला.

१३) रोहित टोकस (कांस्य पदक)

भारताच्या रोहित टोकसला बॉक्सिंगमधील पुरुषांच्या 67 किलो वेल्टरवेट गटाच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. झांबियाच्या स्टीफन झिम्बाविरुद्ध त्याला पराभवाचा सामना करावा लागला. येथे त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

१४) भाविना पटेल, (सुवर्ण पदक)

भाविना पटेलने पॅरा टेबल टेनिसच्या महिला एकेरी वर्गात 3 – 5 गटात सुवर्ण पदक जिंकले. तिने नायजेरियाच्या क्रिस्टियाना इक्पेओईचा 12-10, 11-2, 11-9 असा पराभव केला.


हेही वाचा : ISRO कडून देशाच्या सर्वात छोट्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -