Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा शिखर धवनने घेतली कोरोना लस; लोकांनाही केले आवाहन 

शिखर धवनने घेतली कोरोना लस; लोकांनाही केले आवाहन 

कोरोना योध्यांनी घेतलेली मेहनत आणि त्यांनी केलेले त्याग यासाठी त्यांचे आभार मानावे तितके कमी आहेत, असे धवन म्हणाला.

Related Story

- Advertisement -

भारताचा सलामीवीर शिखर धवनने कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस गुरुवारी घेतला. धवन इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करत होता. मात्र, याच आठवड्यात ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे त्याने आपल्या घरी परत जाऊन कोरोना लस घेतली. याबाबत त्याने ट्विटरवरून माहिती दिली. ‘मी कोरोना लस घेतली. कोरोना योध्यांनी घेतलेली मेहनत आणि त्यांनी केलेले त्याग यासाठी त्यांचे आभार मानावे तितके कमी आहेत,’ असे धवन म्हणाला. तसेच या विषाणूवर मात करण्यासाठी त्याने सर्वांना लस घेण्याचे आवाहन केले.

प्रशिक्षक शास्त्रींनी घेतली होती लस

या महिन्यापासून १८ वर्षांवरील सर्व भारतीय नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यास सुरुवात केली आहे. याचा ३५ वर्षीय धवनने फायदा करून घेतला. याआधी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कोरोनाची लस घेतली होती. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणास सुरुवात झाली आणि शास्त्री यांनी लगेचच लसीचा पहिला डोस घेतला होता.

धवनची दमदार कामगिरी

- Advertisement -

धवन यंदाच्या आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्मात होता. दिल्लीकडून खेळताना यंदा त्याने ८ सामन्यांत ३८० धावा केल्या होत्या. त्यामुळे सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानावर होता. त्याने या धावा ५४ च्या सरासरीने आणि तीन अर्धशतकांच्या मदतीने केल्या होत्या.

- Advertisement -