घरCORONA UPDATEपाकिस्तान क्रिकेट संघातील आणखी सात खेळाडू पॉझिटिव्ह, इंग्लंडचा दौरा धोक्यात!

पाकिस्तान क्रिकेट संघातील आणखी सात खेळाडू पॉझिटिव्ह, इंग्लंडचा दौरा धोक्यात!

Subscribe

मोहम्मद हाफिज आणि वहाब रियाजसह आणखी सात पाकिस्तानी क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह

इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापुर्वी पाकिस्तानच्या खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सोमवारी पाकिस्तान संघातील हैदर अली, हरीस रौफ आणि शादाब खान या तीन खेळाडूंची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आले होते आणि आता त्यात आणखी सात खेळाडूंची भर पडली आहे.

- Advertisement -

मोहम्मद हाफिज आणि वहाब रियाजसह आणखी सात पाकिस्तानी क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ही माहिती दिली आहे. यासह, कोरोना संक्रमित खेळाडूंची संख्या १० झाली आहे. पाकिस्तानच्या १० खेळाडूंसह एकूण ३५ सपोर्ट स्टाफ सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. असे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने मंगळवारी तसे जाहीर केले आहे.

कोरोनाची लागण झालेल्या या ७ खेळाडूंमध्ये काशिफ भट्टी, मोहम्मद हसनैन, फखर जमां, मोहम्मद रिझवान, इम्रान खान, मोहम्मद हाफिज आणि वहाब रियाज यांचा समावेश आहे. संघाच्या १० खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर पाकिस्तानचा इंग्लंड दौरा आता धोक्यात आला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ही चांगली परिस्थिती नसून तंदुरुस्त आणि तरूण १० खेळाडू असून देखील त्यांच्यासोबत असे घडले आहे.

- Advertisement -

पाकिस्तानची २९ सदस्यीय संघ २८ जून रोजी इंग्लंडला रवाना होणार आहे. या दौर्‍यावर पाकिस्तान इंग्लंड विरुद्ध तीन सामन्यांची कसोटी आणि इंग्लंडविरुद्ध अशीच टी -२० मालिका खेळणार आहे. पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूची लागण वेगाने पसरत आहे आणि देशात आतापर्यंत सुमारे १ लाख ८५ हजार रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ३ हजार ६९५ लोकांचा विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.


PAK क्रिकेट संघाला मोठा धक्का! इंग्लंड दौर्‍यापूर्वी ३ खेळाडू पॉझिटिव्ह!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -