घरक्रीडानाशिकच्या विजयात बच्छावची चमक

नाशिकच्या विजयात बच्छावची चमक

Subscribe

राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा

डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छावच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर नाशिकने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत युनायटेड संघाला १३५ धावांनी पराभूत केले. रणजीपटू बच्छावने या सामन्याच्या दोन डावांत मिळून १३ गडी बाद केले. दुसर्‍या सामन्यात सातार्‍याने नांदेडचा एक डाव आणि ८२ धावांनी पराभव केला.

युनायटेडविरुद्धच्या सामन्यात नाशिकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांना पहिल्या डावात १२६ धावाच करता आल्या. परंतु, बच्छावच्या ५ विकेटमुळे त्यांनी युनायटेडला अवघ्या ८९ धावांवर रोखले आणि पहिल्या डावात ३७ धावांची आघाडी मिळवली. नाशिकने आपला दुसरा डाव ६ बाद १७९ धावांवर घोषित केला. त्यांच्या कुणाल कोठावदेने ७० धावांची खेळी केली. त्यामुळे युनायटेडला सामना जिंकण्यासाठी चौथ्या डावात २१७ धावांचे आव्हान मिळाले. मात्र, त्यांचा ८२ धावांतच आटोपला. बच्छावने या डावात ८ विकेट घेतल्या.

- Advertisement -

संक्षिप्त धावफलक – नाशिक : १२६ (श्रीकांत शेरीकर ३२; प्रसाद पाटील ४ बळी) आणि ६ बाद १७९ डाव घोषित (कुणाल कोठावदे ७०; रामकृष्ण घोष ५ बळी) विजयी वि. युनायटेड : ८९ (रोहित करंजकर ३१; सत्यजित बच्छाव ५ बळी) आणि ८२ (आदित्य विजय ३९; सत्यजित बच्छाव ८ बळी).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -