घरक्रीडाधक्कादायक! अंडर 19 क्रिकेटपटूची गळफास घेऊन आत्महत्या!

धक्कादायक! अंडर 19 क्रिकेटपटूची गळफास घेऊन आत्महत्या!

Subscribe

कोरोना व्हायरसच्या संकटात भारतीय क्रिकेटला एक धक्का

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह रजपूतने आत्महत्या केल्याच्या घटनेला चार दिवस झाले असताना अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोरोना व्हायरसच्या संकटात भारतीय क्रिकेटला एक धक्का बसला आहे. त्रिपूराच्या १९ वर्षाखालील महिला क्रिकेट संघाकडून खेळणाऱ्या आणि १९ वर्षांखालील क्रिकेट संघाची सदस्य अयांती रेंग हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

असा घडला प्रकार

त्रिपुरा येथील स्थानिक वृत्तपत्र Syandanने दिलेल्या माहितीनुसार १६ वर्षीय अयंतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी रात्री तिने आत्महत्या केल्याचे समोर आले. मंगळवारी खोलीत तिचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला. तिच्या नजीक कोणतीच सुसाईट नोट सापडलेली नाही. त्यामुळे तिच्या आत्महत्येमागील कारण देखील समजले नाही. चार भावंडांमध्ये अयांती ही सर्वात लहान होती. मागील वर्षांपासून ती त्रिपुराच्या १९ वर्षाखालील संघाची सदस्य असून ती खेळत होती. तिने राज्यस्तरीय २३ वर्षाखालील टी-२० स्पर्धेत सहभागी होऊन संघाचे प्रातिनिधित्व केले होते. त्रिपुराची राजधानी अगरतलापासून ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या उदयपूर येथील रहिवासी होती.

- Advertisement -

?????? ????? (?-?? ??????? ???? ??????) ??????? ???cide.?Could there be anything more grieving about this year.Yet…

The Chhaya Karana Women’s Cricket Academy ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಜೂನ್ 16, 2020

त्रिपूरा क्रिकेट असोसिएशनच्या सचिव तैमीर चंदा यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, अयंतीच्या निधनाचे वृत्त समजल्याने धक्काच बसला आहे. आम्ही एक चांगली युवा क्रिकेटपटू गमावली, ती १६ वर्षाखालील संघाची सदस्य होती. तसेच अयंती कोणत्या तणावात होती का? अशी विचारणा केली असता चंदा म्हणाल्या, काही दिवसांपूर्वी ती राज्य क्रिकेट संघासोबत होती. ती १६ दिवस आमच्या सोबत होती आणि अगदी आनंदी होती. लॉकडाऊनमुळे आम्ही सर्व जण एकत्रच होतो. त्यानंतर आम्ही काही ऑनलाइन कोर्स देखील घेतले होते. पण तिच्या कौटुंबीक अडचणींबद्दल काही कल्पना नसल्याचे चंदा म्हणाल्या.


सुशांत आत्महत्या प्रकरण : सलमान, करण, एकता, भन्साळीविरोधात तक्रार दाखल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -