IPL 2022 : दिल्लीच्या पराभवानंतर मुलींनी घेतली वॉर्नरची शाळा, डेव्हिड वॉर्नरचा खुलासा

यंदा दिल्लीच्या संघाने चांगली कामगिरी केली परंतु प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही.

David Warner revealed After left Delhi in ipl season the girls took my school
दिल्ली बाहेर गेल्यानंतर मुलींनी घेतली वडिल वॉर्नरची शाळा, डेव्हिड वॉर्नरचा खुलासा

डेविड वॉर्नरसाठी आयपीएल २०२२ चे १५ वे हंगाम चांगले ठरले आहे. वॉर्नरने दिल्लीच्या संघासाठी चांगली कामगिरी केली असून ४३२ धावा केल्या आहेत. परंतु दिल्ली कॅपिटल्स आयपीएलच्या १५ व्या हंगामातून बाहेर पडली आहे. संघात केलेल्या कामागिरीनंतर वॉर्नर घरी पोहोचल्यावर अपेक्षित स्वागत करण्यात आले नाही. उलट त्याच्या लेकींनी वॉर्नरची शाळा घेतली असल्याचे समजते आहे. याचे कारण असे की, या धमाकेदार कामगिरीनंतर वॉर्नर घरी पोहोचल्यावर त्याचे अपेक्षित स्वागत झाले नाही. याउलट मुलींनी वॉर्नरचा क्लास घेतला. याचे कारण म्हणजे वॉर्नर आयपीएल 2022 मध्ये एकही शतक करू शकला नाही.

दिल्ली संघाचा खेळाडू डेविड वॉर्नर एकही अर्ध शतक करु शकला नाही. मात्र वॉर्नरने आयपीएलच्या 15 व्या हंगामात 5 अर्धशतके झळकावली आहेत. यातील एकाही अर्धशतकाचे शतकात रूपांतर करता आले नाही. यामुळे वॉर्नर घरी पोहचल्यावर त्याच्या मुलींनी चांगलीच त्याची शाळा घेतली आहे. ऑस्ट्रेलियाला परतल्यावर डेव्हिड वॉर्नरने दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, प्रत्येक वेळी हे अवघड असते कारण प्रत्येक वेळी माझ्या मुली मला विचारत असतात. तुम्ही आयपीएलमध्ये शतक का मारु शकत नाही? त्यांना काय उत्तर देणार इतके सोपं नाही असे वॉर्नर म्हणाला आहे.

वॉर्नरची पत्नी कँडिसनेही या घटनेची आठवण करून देताना सांगितले की, लांना डेव्हिडचं लवकर आऊट होणे आवडत नाही. यानंतर मला त्यांना समजावून सांगणे कठीण होते. मी त्याला समजावून सांगतो की, त्याला शतक करता आले नसले तरी त्याने टीमसाठी महत्त्वाची खेळी खेळली. पण मुलींना वाटते की, त्याने प्रत्येक सामन्यात शतके झळकावली पाहिजेत.
दिल्ली कॅपिटल्सला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही. अखेरच्या सामन्यात दिल्लीला मुंबई इंडियन्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. दिल्लीचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचू शकला नाही. दिल्लीच्या संघामध्ये २०२० मध्ये प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. परंतु विजेतेपदापासून थोडक्यात संधी हुकली होती. यंदा दिल्लीच्या संघाने चांगली कामगिरी केली परंतु प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही.


हेही वाचा : पराभवानंतरही व्हेलोसिटी संघ महिला टी-20 चॅलेंजच्या अंतिम फेरीत