घरक्रीडाIND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा 'हा' प्रमुख फलंदाज दुसऱ्या कसोटीला मुकणार 

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ प्रमुख फलंदाज दुसऱ्या कसोटीला मुकणार 

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीला येत्या शनिवारपासून सुरुवात होणार आहे.

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेची ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली. अ‍ॅडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात मात्र भारताचा संघ ३६ धावांतच गारद झाला. याचा फायदा ऑस्ट्रेलियाला झाला आणि त्यांनी पहिला कसोटी सामना ८ विकेट राखून जिंकला. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला येत्या शनिवारपासून सुरुवात होणार आहे. मात्र, हा सामना सुरु होण्याआधीच ऑस्ट्रेलियाला धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही.

वॉर्नरप्रमाणेच वेगवान गोलंदाज सीन अ‍ॅबटही भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. वॉर्नर आणि अ‍ॅबट दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकणार नाहीत. ऑस्ट्रेलियन संघ सध्या जैव-सुरक्षित वातावरण आहे. परंतु, वॉर्नर आणि अ‍ॅबट हे संघापेक्षा वेगळे राहून दुखापतींवर उपचार घेत आहेत. हे दोघेही सिडनीचे रहिवासी आहेत. मात्र, सिडनीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने या दोघांनाही मेलबर्न येथे हलवण्यात आले होते. वॉर्नर शनिवारच्या सामन्याआधी फिट होईल अशी ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाला आशा होती. मात्र, त्याला फिट होण्यासाठी आणखी काही काळ लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -