घरक्रीडाDenmark Open : सायना फायनलमध्ये पराभूत

Denmark Open : सायना फायनलमध्ये पराभूत

Subscribe

भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालला डेन्मार्क ओपनच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालला डेन्मार्क ओपनच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. तिचा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत चीन ताईपेच्या ताई झू यिंग हिने १३-२१, २१-१३, ६-२१ असा  पराभव केला. त्यामुळे २०१२ डेन्मार्क ओपन जिंकणाऱ्या सायनाला ही स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकण्यात अपयश आले.

असा झाला सामना 

अंतिम सामन्याची सुरुवात सायनासाठी चांगली झाली नाही. ती या सामन्यातील पहिल्या सेटच्या मध्यंतराला ११-५ अशी मागे पडली. त्यातून ती सावरू शकली नाही. त्यामुळे सायनाने हा १३-२१ असा गमावला. पण दुसऱ्या सेटमध्ये तिने चांगले पुनरागमन केले. या सेटच्या सुरुवातीलाच तिने ३-१ अशी आघाडी मिळवली. ही आघाडी तिने मध्यंतरापर्यंत ११-५ अशी वाढवली. यापुढेही तिने चांगला खेळ करत हा सेट २१-१३ असा जिंकला. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी चांगली सुरूवात केली. यिंगकडे ३-२ अशी एकाच गुणाची आघाडी होती. पण यापुढे तिने सलग ८ गुण जिंकत मध्यंतराला आपली आघाडी ११-२ अशी केली. मध्यंतरानंतरही यिंगने आक्रमक खेळ करत हा सेट २१-६ असा मोठ्या फरकाने जिंकला. त्यामुळे तिने डेन्मार्क ओपेनचे जेतेपद पटकावले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -