घरक्रीडाNZ v BAN 2nd Test : डेव्हॉन कॉनवेने रचला इतिहास, पाच कसोटी...

NZ v BAN 2nd Test : डेव्हॉन कॉनवेने रचला इतिहास, पाच कसोटी सामन्यांमध्ये झळकावलं अर्धशतक

Subscribe

पदार्पणानंतर न्यूझीलंडचा फलंदाज डेव्हॉन कॉनवेने कसोटी सामन्यांमध्ये शानदार खेळी केली आहे. डेव्हॉन कॉनवेने रविवारी बांगलादेश विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात स्वत:च्या नावावर एक विक्रम केला आहे. डावखुरा फलंदाज कॉनवेने सुरूवातीच्या पाच कसोटी सामन्यांमध्ये ५० हून अधिक धावा करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.

३० वर्षीय कॉनवे बांगलादेशविरूद्ध कसोटी कारकिर्दीतील ५ वा सामना खेळत आहे. त्याने याआधी ४ कसोटी सामन्यांमध्ये दोन शतक आणि दोन अर्धशतक झळकावले आहेत. कॉनवे बांगलादेशविरूद्धच्या ख्राईस्टचर्च कसोटीतील पहिल्या डावात ९९ धावांवर नाबाद राहीला. तो एका धावाने आपल्या तिसऱ्या कसोटी शतकापासून मुकला आहे.

- Advertisement -

जून २०२१ मध्ये लॉर्ड्समध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटीत पदार्पण

दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या या फलंदाजाने जून २०२१ मध्ये लॉर्ड्समध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटीत पदार्पण केले. कॉनवेने पदार्पणाच्या कसोटी सामन्यात २०० धावांची ऐतिहासिक खेळी केली. त्यानंतर एजबॅस्टन कसोटीत त्याने ८० धावा केल्या. सर्वात वेगवान फलंदाज कॉनवेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध ५४ धावा केल्या. त्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने १२२ धावा केल्या.

- Advertisement -

पाच कसोटी सामन्यांमध्ये ७६ च्या सरासरीने एकूण ६१३ धावा

कॉनवेने आतापर्यंतच्या पहिल्या पाच कसोटी सामन्यांमध्ये ७६ च्या सरासरीने एकूण ६१३ धावा काढल्या. ख्राईस्टचर्च कसोटीच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंड संघाने १ बाद ३४९ धावा केल्या. तर कर्णधार टॉम लॅथमने नाबाद १८६ धावा केल्या आहेत. टॉम लॅथमचे हे पहिले शतक आहे.


हेही वाचा : ST bus accident in Beed: बीडमध्ये एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -