घरक्रीडाधोनी- केदार जाधवने डाव सावरला

धोनी- केदार जाधवने डाव सावरला

Subscribe

 भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात अनुभवी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (&) आणि पुणेकर केदार जाधव () यांनी केलेल्या संयमी खेळीच्या जोरावर भारताने आस्ट्रेलियाचा 6 गडी राखून आरामात पराभव केला. ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या 237 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरूवात काहीशी खराब झाली. सलामीवीर शिखर धवन भोपळा न फोडताचा कुल्टर-नाईलच्या गोलंदाजीवर मॅक्सवेलकरवी झेलबाद झाला.त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला.विराट मोठी खेळी करणार असे वाटत असतानाच झाम्पाने त्याला 44 धावांवर पायचित केले.त्यानंतर रोहित देखील 37 धावा करून बाद झाला. त्यानंतर रायडूदेखील 13 धावा करीत लवकर माघारी परतला. परंतु,त्यानंतर धोनी आणि केदार जाधवने जास्त पडझड होऊ न देता टीम इंडियाला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाकडून झाम्पा आणि कुल्टर नाथन नाईलने प्रत्येकी 2 बळी घेतले.

त्याआधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. कर्णधार फिंच भोपळाही न फोडता जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर धोनीकडे झेल देत माघारी परतला. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून केलेल्या मार्‍याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा संघ 7 गड्यांच्या मोबदल्यात 236 धावांपर्यंत मजल मारू शकला. पहिल्या चेंडूपासून भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर नियंत्रण ठेवत धावसंख्या वाढली जाणार नाही याची काळजी घेतली. यानंतर मार्कस स्टॉयनिस आणि उस्मान ख्वाजा यांनी खेळपट्टीवर तग धरत संघाचा डाव सावरला. या दोघांमध्ये दुसर्‍या विकेटसाठी 87 धावांची भागीदारीही झाली. मात्र विराट कोहलीने केदार जाधवच्या हाती चेंडू सोपवल्यानंतर, केदारने स्टॉयनिसला माघारी धाडत भारताला महत्वाची विकेट मिळवून दिली. उस्मान ख्वाजाने आपले अर्धशतक पूर्ण केले पण, मोठा फटका खेळण्याच्या नादात तो देखील कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर विजय शंकरकडे झेल देत माघारी परतला. यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला 200 धावांचा टप्पा ओलांडून दिला.

- Advertisement -

ग्लेन मॅक्सवेलने 40 धावांची खेळी करत यामध्ये मोलाचे योगदान बजावले. मात्र शमी आणि कुलदीप यादवने मधल्या फळीतील फलंदाजांना मोठी खेळी करण्याची संधी दिली नाही. अखेरीस 50 षटकात कांगारुंचा संघ धावांपर्यंत 236 पोहचला. भारताकडून कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले. त्यांना केदार जाधवने 1 बळी घेत चांगली साथ दिली.

फिंचचा असाही विक्रम

- Advertisement -

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना आज हैदराबाद येथे सुरू आहे. या सामन्यात पुन्हा एकदा कर्णधार अ‍ॅरोन फिंचने निराशा केली. तिसर्‍या सामन्यात त्याला पुन्हा भोपळाही फोडता आला नाही. फिंच १०० व्या सामन्यात शून्यावर बाद होणारा तिसरा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे. यापूर्वी डीन जोन्स आणि क्रेग मॅग्डरमोट हेदेखील १०० व्या सामन्यात शून्यावर बाद झाले आहेत. फिंच मागील ८ सामन्यात ४५ धावा करू शकला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -