IND vs NZ- भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय

भारताने दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला आहे. ९० धावांनी न्यूझीलंडवर भारताने मात केली आहे. मात्र न्यूझीलंडच्या तळाच्या बॅट्समनने भारतीय बॉलर्सना चांगलेच झुंजवले असले तरीही मोठ्या फरकाने सामना भारताने जिंकला.

india team
भारतीय संघ

भारताने दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला आहे. ९० धावांनी न्यूझीलंडवर भारताने मात केली आहे. मात्र न्यूझीलंडच्या तळाच्या बॅट्समनने भारतीय बॉलर्सना चांगलेच झुंजवले असले तरीही मोठ्या फरकाने सामना भारताने जिंकला. भुवनेश्वर आणि चहलने विकेट घेत न्यूझीलंडचा डाव संपवला असून भारताकडून कुलदीपने चार विकेट्स घेत महत्त्वाची कामगिरी बजावली.

कुलदीपचा भेदक मारा 

ऑस्ट्रेलियामधील अप्रतिम कामगिरीनंतर न्यूझीलंडविरुद्धदेखील भारताची टीम सध्या फॉर्ममध्ये आहे. कुलदीप यादवच्या भेदक माऱ्यापुढे न्यूझीलंडचा संघ जास्त वेळ तग धरू शकला नाही. चार विकेट्स घेत कुलदीपने हा सामना भारताच्या बाजूने झुकवला. तत्पूर्वी भारताने ३२४ धावांचा डोंगर उभा केला होता. या धावांचा पाठलाग करताना ४०.२ ओव्हर्समध्येच न्यूझीलंडचा संघ केवळ २३४ धावांवर गारद झाला. भारताला प्रजासत्ताक दिनाची भेट भारताने दिली आहे असे म्हणावे लागेल. कुलदीपच्या साथीने इतर बॉलर्सपैकी चहलने दोन आणि केदार जाधवने एक विकेट काढली. याशिवाय भुवनेश्वरने दोन तर मोहम्मद शामीने एका बॅट्समनला आऊट केले. न्यूझीलंडने ३२४ धावांचा पाठलाग करत असताना वाईट सुरुवात केली. मात्र शेवटच्या बॅट्समनने चांगलाच दम काढला. डग ब्रेसवेलने केवळ ५७ रन्स काढून डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र बाकी न्यूझीलंडचे बॅट्समन अपयशी ठरले. तर भारताकडून रोहित शर्माला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार अर्धशतकाच्या जोरावर देण्यात आला. या विजयासह आता भारताने मालिकेमध्ये २-० आघाडी घेतली आहे.

भारताची दमदार सुरुवात

भारताने न्यूझीलंड दौऱ्यातही आपली कामगिरी सातत्यपूर्ण राखली आहे. आजच्या मॅचमध्ये नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेत भारताच्या बॅट्समनने ४ बाद ३२४ धावांचा मजल मारली. रोहित शर्मा आणि शिखर धवन या दोघांनाही आक्रमक सुरुवात केली. तर दोघांनीही या मॅचमध्ये अर्धशतक खेळी केली. मात्र पहिल्यांदा ६६ रन्स करून शिखर आऊट झाला. त्यानंतर रोहितने ८७ रन्सची खेळी केली. तर विराटने ४३ आणि अंबाती रायडूने ४७ रन्स केल्या. तर धोनी आणि केदार जाधवने भारताला तीनशेचा टप्पा पार करून देत चांगली धावसंख्या उभारली.