घरक्रीडाकसोटी सामन्यात इंग्लंडने टी-२० फॉर्म्युला वापरत न्यूझीलंडचा केला पराभव

कसोटी सामन्यात इंग्लंडने टी-२० फॉर्म्युला वापरत न्यूझीलंडचा केला पराभव

Subscribe

इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या कसोटीमध्ये (Test Match) इंग्लंडने ऐतिहासिक असा विजय न्यूझीलंडवर मिळवला आहे. या सामन्यात इंग्लडसमोर विजयासाठी एकूण २९९ धावांचे लक्ष्य होते.

इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या कसोटीमध्ये (Test Match) इंग्लंडने ऐतिहासिक असा विजय न्यूझीलंडवर मिळवला आहे. या सामन्यात इंग्लडसमोर विजयासाठी एकूण २९९ धावांचे लक्ष्य होते. हे लक्ष्य इंग्लंडने टी-२० चा (T-20) फॉर्म्युला वापरत पूर्ण केले. यावेळी जॉनी बेयरस्टोने (Jonny Bairstow) तुफानी खेळी केली. (jonny bairstow scored century and england historic win againts new zealand in eng vs nz 2nd test)

इंग्लंडला विजयासाठी २९९ धावांचे आव्हान

- Advertisement -

या कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी २९९ धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी आक्रमक खेळी केली. न्यूझीलंडच्या आव्हानानुसार इंग्लंडला प्रती ओव्हर ४ धावांची आवश्यकता होती. मात्र, इंग्लंडने या आव्हानाचा पाठलाग ५० षटकातच केला.

हेही वाचा – इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने रचला इतिहास, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला वेगवान गोलंदाज

- Advertisement -

टी-२० स्टाईलने फलंदाजी

इंग्लंडच्या या विजयामध्ये जॉनी बेयरस्टोची खेळी मोलाची ठरली. जॉनी बेयरस्टोने टी-२० क्रिकेटच्या स्टाईलने फलंदाजी केली. यावेळी त्याने १४ चौकार आणि ७ षटकार मारत ९२ चेंडूत १३६ धावा केल्या. विशेष म्हणजे बेयरस्टोने ७७ चेंडूतच शतक पूर्ण केले.

कसोटीमध्ये सगळ्यात जलद शतक

जॉनी बेयरस्टोने केलेल्या या शतकी खेळीमुळे इंग्लंडकडून कसोटीमध्ये सगळ्यात जलद शतक करणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. इंग्लंडकडून सगळ्यात जलद शतक गिलबर्ट जेसोप यांच्या नावावर आहे. १९०२ साली त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७६ चेंडूत शतक केले होते.

हेही वाचा – प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या मालकीच्या पबला आग; स्वत: ट्विट करत दिली माहिती

बेयरस्टोसोबत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सनेही (Ben Stokes) आक्रमक खेळी केली. टीम साऊदीच्या बॉलिंगवर स्टोक्सने सिक्स मारून त्याचे अर्धशतक पूर्ण केले. स्टोक्स ७० बॉलमध्ये ७५ धवांवर नाबाद राहिला, यात त्याने १० फोर आणि ४ सिक्स मारल्या.

टी ब्रेकनंतर इंग्लंडने ११ षटकामध्येच ११ धावा प्रती षटकाच्या सरासरीने १२५ धावा केले आणि सामना आपल्या खिशात टाकला. या विजयासोबतच इंग्लंडने २ कसोटी सामन्यांची ही मालिका २-० ने जिंकली.

प्रथम गोलंदाजीचा निर्णय

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५५३ धावा केल्या. डॅरेल मिचेलने १९० आणि टॉम ब्लंडेलने १०६ रन केले. यानंतर इंग्लंडने पहिल्या सत्रातमध्ये ५३९ धावा केल्यामुळे न्यूझीलंडच्या संघाला १४ धावांची आघाडी मिळाली. न्यूझीलंडचा दुसऱ्या संत्रामध्ये २८४ धावांवर ऑल आऊट झाला आणि इंग्लंडला २९९ धावांचे आव्हान मिळाले.


हेही वाचा – Paavo Nurmi Games 2022 : नीरज चोप्राने मोडला स्वत:चाच नॅशनल रेकॉर्ड; पण गोल्ड मेडल हुकले

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -