घरताज्या घडामोडीमुंबईत पर्यावरणस्नेही, आकर्षक एक हजार बस थांबे उभारण्यात येणार

मुंबईत पर्यावरणस्नेही, आकर्षक एक हजार बस थांबे उभारण्यात येणार

Subscribe

बेस्ट परिवहन विभागाने महालक्ष्मी रेसकोर्स येथे उभारलेल्या पर्यावरणस्नेही, आकर्षक बस थांब्यांच्या धर्तीवर लवकरच एक हजार ठिकाणी असे बस थांबे उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा नियोजन व विकास निधीतून खर्च करण्यात येणार आहे. बेस्ट उपक्रम तोट्यात सुरू असला तरी आपल्या वीज ग्राहकांना व बस प्रवाशांना विविध प्रकारच्या सेवासुविधा देत आहे. आता बेस्टच्या प्रवाशांसाठी पर्यावरणस्नेही, आकर्षक बस थांबे उपलब्ध होणार आहेत.

महालक्ष्मी रेसकोर्स जवळील बस थांबा पर्यावरणस्नेही व आकर्षक केल्यानंतर आणखी ३५० बस थांब्यांना नवीन लुक देण्यात येणार आहे. तसेच भविष्यात एक हजार थांब्यांचा कायापालट होणार असून जिल्हा नियोजन व विकास निधीतून खर्च करण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने दिली.

- Advertisement -

मुंबईकरांची दुसरी लाईफ लाईन म्हणून बेस्ट बसेसची ओळख आहे. सुरक्षित व आरामदायी प्रवास म्हणून प्रवासी बेस्ट बसेसना पंसती देत आहेत. पर्यावरणस्नेही व आकर्षक बस थांबे प्रवाशांसाठी आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरत आहे. त्यामुळे मुंबईतील बस थांब्यांचा कायापालट करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. बेस्ट उपक्रमाचे २७ बस आगार असून सहा हजार बस थांबे आहेत. पर्यावरणस्नेही व आकर्षक बस थांब्यांना प्रवाशांची पंसती मिळत असल्याने ३५० बसथांबे विकसित करण्याचे काम सुरु केले आहे. या कामासाठी लागणारा निधी राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या निधीतून उपलब्ध होणार आहे.

३५० बस थांब्यांचा कायापालट झाल्यानंतर आणखी एक हजार बसथांब्यांचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. अशाप्रकारे येत्या ६ ते ८ महिन्याच्या कालावधीत मुंबईतील जवळपास सर्वच बसथांबे पर्यावरणस्नेही आणि आकर्षक स्वरुपाचे असतील, असा विश्वास बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.

- Advertisement -

बेस्टचे खाजगी अस्थापनांना आवाहन

मुंबईच्या सौंदर्यात भर घालणा-या या उपक्रमाच्या मदतीसाठी विविध कॉर्पोरेट हाऊसेस, बँका, उत्पादक संस्था, प्रसार माध्यम संस्था, तसेच अन्य व्यवसाय संस्थांनी त्यांच्या कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंडाद्वारे या नवीन बसथांब्याच्या बांधकाम व देखरेखीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन बेस्ट उपक्रमाद्वारे करण्यात आले आहे. अशा व्यवसाय संस्थांना बेस्ट उपक्रमाद्वारे जाहिरात दरांमध्ये सवलत देण्यात येणार आहे.


हेही वाचा : पुणे-बंगळुरू महामार्गावर साऊंडप्रुफ वॉल उभारावेत, सुप्रिया सुळेंची नितीन गडकरींना पत्रातून


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -