घरक्रीडाAUS vs ENG 1st Test : भारतीय वेळेनुसार कधी आणि कुठे पाहू...

AUS vs ENG 1st Test : भारतीय वेळेनुसार कधी आणि कुठे पाहू शकतो ॲशेसचे सामने?; जाणून घ्या

Subscribe

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी संघर्षमय मालिका म्हणून ओळख असलेल्या ॲशेस मालिकेला बुधवार पासून सुरूवात होत आहे

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी संघर्षमय मालिका म्हणून ओळख असलेल्या ॲशेस मालिकेला बुधवार पासून सुरूवात होत आहे. कोरोना संकटाचे सावट असताना देखील ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे संघ ॲशेस मालिकेसाठी आमनेसामने असणार आहे. ८ डिसेंबर म्हणजेच बुधवारपासून या मालिकेची सुरूवात ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमधून होत आहे. दोन्हीही संघानी आपापल्या संघाची घोषणा केली आहे. दरम्यान लोकप्रिय ॲशेस मालिकेची चर्चा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातच नसून संपूर्ण जगभर आहे. भारतताही या मालिकेचे खूप चाहते आहेत. पहिल्या सामन्याची सुरूवात बुधवारी भारतीय वेळेनुसार सकाळी ५.३० वाजता होणार आहे.

बुधवारी भारतीय वेळेनुसार सकाळी ५.३० वाजता सुरू होणाऱ्या पहिल्या सामन्याचे लाइव कव्हरेज सोनी नेटवर्क वाहिनीवर असणार आहे. लक्षणीय म्हणजे या सामन्याचे ऑनलाइनही कव्हरेज पाहता येणार आहे. सोनी नेटवर्क अॅपच्या माध्यमातून ॲशेस मालिकेचे लाइव्ह प्रसारण पाहता येणार आहे. सोबतच सोनी नेटवर्कच्या संकेतस्थळावर यावर देखील धावफलक पाहता येणार आहे. ॲशेस मालिकेसाठी दोन्हीही संघ सज्ज झाले आहेत. दोन्हीही संघानी पहिल्या सामन्यासाठी आपल्या प्लेइंग इलेव्हवनची घोषणा केली आहे.

- Advertisement -

पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ

जो रूट (कर्णधार), स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जोस बटलर, हसीब हमीद, जॅक लीच, डेव्हिड मलान, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स, मार्क वुड,

- Advertisement -

पहिल्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ

मार्कस हॅरिस, डेविड वॉर्नर, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, कॅमरॉन ग्रीन, ॲलेक्स कॅरी, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोस हेझलवुड,


हे ही वाचा: http://IND vs SA : भारताविरूध्दच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घोषणा; डीन एल्गर करणार नेतृत्व


 

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -